Beed Crime : "अजूनही बीडमध्ये वाल्मिक कराडची बी टीम ॲक्टिव्ह..."; संतोष देशमुखांच्या भावाचा पोलिसांवर गंभीर आरोप, म्हणाले...

Santosh Deshmukh Murder : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींची बी टीम बीडमध्ये अजूनही सक्रिय असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
Dhananjay Deshmukh, Santosh Deshmukh
Dhananjay Deshmukh, Santosh DeshmukhSarkarnama
Published on: 
Updated on: 

Beed News, 14 Feb : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींची बी टीम बीडमध्ये अजूनही सक्रिय असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

शिवाय या टीमकडे पोलिसांकडून (Police) दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिने उलटून गेले आहेत. तरीही या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. त्यामुळे पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

एकीकडे देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील गुंडाराज उजेडात आला आहे. तर अनेक आरोपींना पोलिसांचंच पाठबळ असल्याचंही उघडकीस आलं होतं. या हत्या प्रकरणाचा मुख्य सुत्रधार असा आरोप होत असलेल्या वाल्मिक कराडसह (Walmik Karad) इतर आरोपी पोलिसांच्या अटकेत आहेत. मात्र, कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे.

Dhananjay Deshmukh, Santosh Deshmukh
Pooja Khedkar : पूजा खेडकरला मोठा दिलासा ! सर्वोच्च न्यायालयाने दिला 'हा' आदेश

तर याच सर्व आरोपींना मदत करणारी बी टीम अजूनही बीडमध्ये ॲक्टिव्ह असल्याचा दावा धनंजय देशमुख यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या चर्चांना उधाण आलं असून पोलिस फरार आरोपींच्या मुसक्या कधी आवळणार आणि देशमुख कुटुंबियांना कधी न्याय देणार? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

धनंजय देशमुख नेमकं काय म्हणाले?

माध्यमांशी बोलताना धनंजय देशमुख म्हणाले, "बीड (Beed) पोलिसांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना मदत करणाऱ्यांना अद्याप ताब्यात घेतलेलं नाही. या आरोपींकड पोलिस त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहेत.

Dhananjay Deshmukh, Santosh Deshmukh
Sanjay Raut : "शरद पवार आम्हाला पित्यासमान...", राऊतांचा सूर बदलला, आधी थयथयाट आता मवाळ भूमिका

या बी टीमनेच विष्णू चाटे, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे यांच्यासह इतर आरोपींना पळून जाण्यासाठी मदत केली आहे. त्यांनीच आरोपींना पळीन जाण्यासाठी गाडी आणि पैसे पुरवले. मात्र, बीड पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करत नाहीत." शिवाय संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आरोपींना पळून जाण्यासाठी पोलिसांनी मदत केल्याचा संशय देखील त्यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.