Beed Satish Bhosale: तुरुंगात 'खोक्या'पर्यंत पोचतोय गांजा, कैद्यांसोबत ढिशूम... ढिशूम..; बंदोबस्तावरील कर्मचाऱ्यालाही धमकावलं

Beed Satish Bhosale Threatens Police Officer After Fight With Inmate : कुख्यात गुंड सतीश भोसले ऊर्फ खोक्या याची तुरुंगात देखील दहशत असल्याचे समोर आलं आहे.
Satish Bhosale
Satish BhosaleSarkarnama
Published on
Updated on

Satish Bhosale Beed News: भारतीय जनता पक्षाचा आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय असलेला सतीश भोसले ऊर्फ खोक्या हा कैदी असला, तरी त्याचा कारनामे थांबलेले नाही. तुरुंगात देखील त्याचे कारनामे सुरूच आहेत. कैदी असलेल्या सतीश भोसले ऊर्फ खोक्यापर्यंत गांजा पोचत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

तुरूंगात गांजा वाटून घेण्यावरून वाद झाला आहे. हा वाद सोडवण्यासाठी बंदोबस्तावर असलेला पोलिस कर्मचारी धावला असता, त्याला देखील धमकी दिली. या प्रकारामुळे खोक्याची दहशत अजून संपण्याचं नाव घ्यायला तयार नाही.

बीड (BEED) जिल्हा कारागृहातील बॅरेक नंबर चारमध्ये असलेल्या चार कैद्यांमध्ये गांजा वाटून घेण्यावरून वाद झाला. हा वाद ऐकून बंदोबस्तावर असलेल्या कर्मचाऱ्याने धाव घेतली. पण चार कैद्यांनी धावून पोलिस कर्मचाऱ्यावर धावून जात शिवीगाळ केली. तसेच बाहेर सुटल्यावर तुला बघून घेतो, अशी धमकी दिली.

या कैद्यांच्या मारामारीत आणि बंदोबस्तावर असलेल्या पोलिस (Police) कर्मचार्‍याला धमकी देण्यात सतीश भोसले ऊर्फ खोक्या देखील होता. खोक्या भोसले हा चार गुन्ह्यांमध्ये सध्या कारागृहात असून त्याच्यासह शाम पवार, वसीम पठाण, यमराज राठोड या तिघांमध्ये हा वाद झाला.

Satish Bhosale
Nilesh Lanke Vs Vikhe Patil : सुजयदादाच्या 'जनसेवे'ची खासदार लंकेंच्या 'सहकार'ला धोबीपछाड

कारागृह पोलिसांनी या मारामारीची आणि खोक्याने बंदोबस्तावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला दिलेल्या धमकीची गंभीर दखल घेतली आहे. बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Satish Bhosale
Dadar Kabutarkhana : कबुतरखान्यासाठी शस्त्र हाती घेऊ म्हणणाऱ्या जैन मुनीविरुद्ध 'मराठी समिती' आक्रमक, आरपारची लढाई होणार!

बीड जिल्हा कारागृहात यापूर्वी देखील गांजा, मोबाईल फोन आढळून आला होता. आता तर गांजा वाटून घेण्यावरून कैद्यांमध्ये वाद आणि कर्मचार्‍याला धमकी देण्याचा प्रकार घडल्याने कारागृह प्रशासनाचा ढिसाळ कारभार समोर आला आहे.

'खोक्या'ला एका गुन्ह्यात जामीन

शिरूर पोलिस ठाण्यामध्ये 'खोक्या'विरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यात जामीन मिळाला आहे. शिरूर कासारच्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाने हा जामीन मंजूर केला आहे. परंतु 'खोक्या'चा मुक्काम जेलमध्येच असणार आहे. कारण त्याच्यावर 3 गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी एकाच गुन्ह्यात त्याला जामीन मिळाला आहे. बॅटने मारहाण प्रकरण, आणि ढाकणे कुटुंबावर जीवघेणा हल्ला या प्रकरणात अद्याप त्याला जामीन मिळालेला नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com