Devendra Fadnavis In Assembly Session : बीड लैगिंक अत्याचार प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी! मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Maharashtra CM Devendra Fadnavis announced in the state assembly the formation of a Special Investigation Team (SIT) to investigate the Beed sexual assault case. : प्रकरणाचा छडा लावून टाईमबाॅन्ड पद्धतीने तपास केला जाईल. आरोपींना कठोर शिक्षा होईल, आरोपींना कोणाचा राजकीय वरदहस्त असेल तर त्याचा तपास करून त्यांनाही शिक्षा केली जाईल.
CM Devendra Fadnavis On Beed News
CM Devendra Fadnavis On Beed NewsSarkarnama
Published on
Updated on

Beed Crime News : बीड शहरातील एका खासगी कोचिंग क्लासेसमध्ये नीटची तयारी करत असलेल्या सतरा वर्षीय अल्पवयीन विद्यार्थीनीवर संस्थाचालक आणि शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या घटनेने संपूर्ण बीड जिल्हा आणि महाराष्ट्रात खळबळ उडाली. पिडित मुलीने व तिच्या आईने हिंमत दाखवून आरोपींच्या विरोधात तक्रार दिल्यानंतर विजय पवार, खाटोकर यांच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला.

गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेबद्दल पालकांमध्ये आणि सर्वसामान्यांमध्ये संताप आहे. विधीमंडळात या विषयावर हडपसरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चेतन तुपे यांनी महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करून चौकशी करावी, अशी मागणी केली. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी घटनेचे गांभीर्य आणि संवेदनशीलता पाहता या लैगिंक अत्याचार प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली.

गुरू-शिष्याच्या प्रतिमेला बीडमधील घटनेने काळे फासण्याचे काम केले आहे. पिडित मुलीने आणि तिच्या आईने नराधम संस्थाचालक आणि शिक्षकाच्या विरोधात पोलीसात तक्रार दाखल करण्याचे धाडस दाखवले. आरोपींना अटक करून त्यांच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा नोंद झालेला आहे. (Beed News) परंतु या प्रकरणाची चौकशी पोलीसांकडून व्यवस्थीत सुरू नसल्याचा आरोप केला जात आहे. आरोपींना अटक होऊन पोस्कोअंतर्गत गुन्हा नोंद असताना फक्त दोन दिवसांचा पीसीआर कसा मागितला गेला? असा सवाल आमदार तुपे यांनी उपस्थितीत केला. पोलीसांच्या या भूमिकेमुळे संशयाचे वातावरण निर्माण होत आहे. आरोपींच्या मागे कोणाचा राजकीय वरदहस्त आहे का? याचा शोध घेऊन सखोल चौकशी सरकार करणार आहे का? एसआयटी नेमली जाईल का?

CM Devendra Fadnavis On Beed News
Dhananjay Munde : बीड लैगिंक छळ प्रकरणी धनंजय मुंडेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट! एसआयटी तपासाची केली मागणी

इतर मुलींच्या बाबतीत असा काही प्रकार घडला का? याचीही चौकशी होणे गरजेचे असल्याचे मुद्दे आमदार तुपे यांनी सभागृहात मांडले. यावर सरकारची भूमिका स्पष्ट करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरवातीलाच बीड लैगिंक अत्याचार प्रकरणाची आयपीएस महिला अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी समिती नेमूण चौकशी केली जाईल, अशी घोषणा केली. हिमंतीने मुलीने तिच्या आईने तक्रार दिल्याने पोस्को अंतर्गत आरोपींवर गुन्हा नोंद झाला आहे. दोन दिवसांची पीसीआर का? याची चौकशी केली जाईल. इतर मुलींसोबत असा काही प्रकार घडला का? याची चौकशी त्यांना विश्वासात घेऊन केला जाईल.

CM Devendra Fadnavis On Beed News
Beed sexual harassment : बीड कोचिंग क्लास लैंगिक छळ प्रकरणी मोठी अपडेट! पीडितीने बालकल्याण समितीसमोर सांगितले नराधम शिक्षकाचे विकृत चाळे

प्रकरणाची व्याप्ती आणि संवेदनशीलता लक्षात घेऊन एसआयटी समिती स्थापन करू. महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली ही समिती काम करेल. यामागे कोण आहेत, कोणाचा राजकीय वरदहस्त आहे का? याचीही चौकशी केली जाईल. प्रकरणाचा छडा लावून टाईमबाॅन्ड पद्धतीने तपास केला जाईल. आरोपींना कठोर शिक्षा होईल, आरोपींना कोणाचा राजकीय वरदहस्त असेल तर त्याचा तपास करून त्यांनाही शिक्षा केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

CM Devendra Fadnavis On Beed News
Suresh Dhas On Sandip Kshirsagar : आरोपींसोबतच्या फोटोवरून एखाद्याचे नाव घेणे चुकीचे! सुरेश धस यांच्याकडून संदीप क्षीरसागर यांची पाठराखण

विशेष म्हणजे कालच, परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना बीड लैंगिक अत्याचार प्रकरणाची चौकशी एसआयटी मार्फत करावी, अशी मागणी केली होती. या संदर्भात निवेदन देत त्यांनी या प्रकरणाची चौकशी महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी समितीने करावी, अशा मागणीचे निवेदन मुंडे यांनी दिले होते. त्यानंतर आज एसआयटीची घोषणा करण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com