Beed Shiv Sena News : ग्रामपंचायत लढवल्यानेच शिवसेना पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; जिल्हाप्रमुख खांडेंवर गुन्हा...

Beed Crime News : ज्ञानेश्वर खांडे यांच्या फिर्यादीनुसार ते व शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे हे दोघेही एकाच गावातील आहेत.
Beed Shiv Sena News :
Beed Shiv Sena News :Sarkarnama
Published on
Updated on

Beed News : शिवसेना (शिंदे गट) उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांच्यावरील जीवघेणा हल्ला हा पक्षाचे पद घेतल्याने व ग्रामपंचायत लढविल्यानेच झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यासह एकूण 12 जणांवर जिवे मारण्याच्या प्रयत्नाच्या कलमासह (307) इतर कलमांन्वये बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

Beed Shiv Sena News :
Sanjay Kokate Join NCP : 'संजय कोकाटे, राष्ट्रवादी बळकट करा; माढ्यातून तुमचा सूर्य तुतारीच्या नावाने उगवेल'

ज्ञानेश्वर खांडे यांच्यावर दोन दिवसांपूर्वी जीवघेणा हल्ला झाला. यात गंभीर जखमी झालेल्या खांडेंवर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी याबाबत पोलिसांना दिलेल्या जबाबावरून हा गुन्हा नोंद झाला आहे. ज्ञानेश्वर खांडे यांच्या फिर्यादीनुसार ते व शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे हे दोघेही एकाच गावातील आहेत. ज्ञानेश्वर खांडे यांनी मागच्या वर्षी ग्रामपंचायत निवडणुकीत कुंडलिक खांडे यांच्या पॅनेलच्या विरोधात पॅनेल उभा केला होता.

राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा! )

निवडणुकीत पॅनेल टाकू नये म्हणून कुंडलिक खांडे यांच्यासह त्यांचे भाऊ गणेश खांडे व बाळू खांडे यांच्याकडून सतत दबाव आणि हस्ते-परहस्ते हातापाय तोडून टाकण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या. याबाबत पोलिस अधिकाऱ्यांना भेटून कल्पना व लेखी अर्जही दिला होता, असे ज्ञानेश्वर खांडे यांनी आपल्या जबाबात म्हटले आहे. ग्रामपंचायतीमध्ये माहिती अधिकार दिल्याचाही राग होता. तसेच अलीकडेच ज्ञानेश्वर खांडे यांना शिवसेनेचे माजलगाव, वडवणी कार्यक्षेत्राचे उपजिल्हा प्रमुखपद भेटले होते. या निवडीच्या बॅनरवर जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांचा फोटो नसल्याचाही राग होता, असेही या जबाबात म्हटले आहे.

Beed Shiv Sena News :
BJP V/s Congress : निरुपम यांची भाजपची वाट खडतर? मोहित कंबोज म्हणाले, 'काँग्रेसचा कचरा...'

दरम्यान, मंगळवारी (ता. दोन) कुंडलिक खांडे यांच्या मामाचा मुलगा गोरख ऊर्फ पप्पू शिंदे यानेही फोन करून धमक्या दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण मित्र अविनाश खांडे व शंकर राऊत यांच्यासोबत कारमधून (एमएच 12 ईटी 2234) गावाकडे जात असताना बीड शहरातील तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या काही अंतरावर गावातीलच सुनील पाटोळे, बाबा पाटोळे, कृष्णा पाटोळे व बीडच्या लाला दुनघव यांनी त्यांचे वाहन आपल्या वाहनाला आडवे लावल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. (Crime News)

यानंतर दोन दुचाकीवर लाकडी दांडे हातात घेऊन चौघे आले आणि मग कारमधून लोखंडी रॉड आणि लोखंडी शॉकअपने मारहाण केली. या वेळी मारहाण करताना कुंडलिक खांडे शहराबाहेर दवाखान्यात ॲडमिट असल्याने तू त्यांचे नाव घेऊ शकत नाहीस, आम्ही ठरल्याप्रमाणे काम केले असे हल्लेखोर म्हणत होते, असेही फिर्यादीत नमूद केले आहे.

ज्ञानेश्वर खांडे यांच्या फिर्यादीवरून कुंडलिक खांडे यांच्यासह त्यांचे भाऊ गणेश खांडे, नामदेव खांडे, गोरख शिंदे, बाबा पाटोळे, सुनील पाटोळे, कृष्णा पाटोळे, लाला दुनघव यांच्यासह इतर अनोळखी चौघांवर बीड ग्रामीण पोलिस (Police) ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. तपास फौजदार नितीन काकरवाल करत आहेत.

(Edited By - Chetan Zadpe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com