Beed Crime : "गाडीतीलं पेट्रोल संपलंय..."; म्हणत मध्यरात्री मदत मागायला आले अन् घात केला; बीडमध्ये शिवसेना नेत्यावर जीवघेणा हल्ला

Beed Attack on Shivsena Coordinator : शिवसेनेच्या वैद्यकीय मदत कक्षाचे बीड समन्वयक विलास म्हस्के यांच्या तक्रारीवरून बिझनेस पार्टनरसह पाच अनोळखी हल्लेखोरांवर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, सततच्या गुन्हेगारीच्या घटनेमुळे बीडमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
Beed Crime News
Beed Crime NewsSarkarnama
Published on
Updated on

Beed News, 24 Aug : मध्यरात्री मदत मागण्याच्या बहाण्याने शिवसेनेच्या वैद्यकीय मदत कक्षाचे बीड समन्वयक विलास म्हस्के यांना घराबाहेर बोलवून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

बीड जिल्ह्यातील पालवण गावात ही घटना घडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात विलास म्हस्के गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

तर हा हल्ला आर्थिक व्यवहारातून झाल्याचा संशय म्हस्के यांनी व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विलास मस्के त्यांच्या घरामध्ये झोपले असताना गुरुवारी मध्यरात्री त्यांच्या घराचा दरवाजा कुणीतरी ठोठावला.

Beed Crime News
Supriya Sule : "मी मटण खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं"; सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर फडणवीसांनी एका वाक्यातच विषय संपवला

त्यानंतर म्हस्केंच्या बहिणीने दरवाजा उघडल्यानंतर एका अनोळखी व्यक्तीने गाडीतील पेट्रोल संपले असून आपणाला पेट्रोल पाहिजे, असं सांगितलं. मध्यरात्री अनोळखी व्यक्तीला मदत करावी म्हणून विलास म्हस्के घराबाहेर येताच त्यांच्यावर य चार ते पाच हल्लेखोरांनी हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्यावर आणि हातावर वार करण्यात आले.

Beed Crime News
PMC Election : कुठे दिग्गजांना धक्का तर कुठे युतीतील नेते आमने-सामने, पुण्यातील प्रभाग रचनेमुळे राजकीय समीकरणे बदलणार

दरम्यान, या हल्ल्यानंतर म्हस्केंनी बिझनेस पार्टनरवर संशय व्यक्त केला असून ही घटना आर्थिक व्यवहारातून घडल्याची शक्यता नाकारता येत नाही, असं पोलिसांचं म्हणण आहे. तर म्हस्के यांच्या तक्रारीवरून बिझनेस पार्टनरसह पाच अनोळखी हल्लेखोरांवर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, सततच्या गुन्हेगारीच्या घटनेमुळे बीडमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com