Manoj Jarange Indefinite Hunger Strike : मराठा आंदोलकांच्या धास्तीने एसटी बसला पोलिसांचे कवच; बससेवा दुसऱ्या दिवशीही बंद

Maratha Reservation: एसटी बस वाहतूक आज सलग दुसऱ्या दिवशीदेखील बंद ठेवण्यात आली आहे.
Maratha protesters
Maratha protestersSarkarnama
Published on
Updated on

Beed Latest News : मराठा आंदोलकाच्या धास्तीने विविध ठिकाणी थांबून ठेवलेल्या जवळपास 50 एसटी बसचा ताफा, पोलिस बंदोबस्तात बीडमध्ये दाखल झाला आहे. बीड शहरातील मुख्य बस स्थानक त्याचबरोबर विभागीय डेपो परिसरात या बस लावण्यात आल्या आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर या बसच्या ताफ्याच्या समोर पोलिस व्हॅन, त्याचबरोबर मध्यभागी एक पोलिस व्हॅन आणि पाठीमागे एक पोलिसांची गाडी ठेवून हा बसचा ताफा सोलापूर महामार्गावर असणाऱ्या मांजरसुंबा परिसरातून बीड शहरात दाखल झाला आहे. दरम्यान, मराठा आंदोलकांकडून आता एसटी बस टार्गेट केली जात असल्याने सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील सर्व एसटी बस वाहतूक आज सलग दुसऱ्या दिवशीदेखील बंद ठेवण्यात आली आहे.

Maratha protesters
Beed Latest News : बीडमध्ये मध्यरात्री तहसीलदारांची गाडी पेटविली !

बीड जिल्ह्यात तणाव

बीडमधून मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर, मराठा आंदोलकांकडून एसटी बस टार्गेट केली जात आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी बीड जिल्ह्यातील एसटी बस वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहे. एसटी बस वाचवण्यासाठी पोलिसांचा मात्र बीड बस स्थानकाच्या परिसरात बंदोबस्त लावण्यात आला आहे. दुसरीकडे रात्रीदेखील बीड शहरात रस्त्यावर टायर जाळून मुख्य रस्ता अडवण्यात आला होता. मध्यरात्री आष्टी शहरात तहसीलदार प्रमोद गायकवाड यांची शासकीय गाडी अज्ञात व्यक्तींकडून जाळण्यात आली. यामुळे बीड जिल्ह्यात तणावपूर्ण वातावरण असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

बुलडाण्यात वाहनांवर दगडफेक

बुलडाणा येथे दहा ते बारा जणांच्या टोळक्याने वाहनांवर दगडफेक केली. ट्रकचालकांनाही मारहाण केली. दोन जण जखमी, ट्रकचेदेखील नुकसान झाले आहे. ट्रकमधील साहित्य आणि चालकाचे पैसे असलेले पाकीट चोरले. मलकापूर राष्ट्रीय महामार्गावरील नांदुरानजीक बायपासवरील रात्री अकरा वाजताच्या सुमाराची घटना घडली. पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

Maratha protesters
Babanrao Shinde: अजितदादांच्या आमदाराला पैसे देण्यासाठी मराठा समाजाने धरली झोळी; दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com