Beed : मुख्यालयी रहा, २४ तास ड्युटीची झंजट संपणार; मुंडेंच्या बदलीच्या हालचाली..

दहाएक दिवसांपूर्वी मंत्र्यांनी अनेक जिल्ह्यांतील जेष्ठ अधिकाऱ्यांना बोलावून मुंडेंबद्दल माहिती घेतली. मुंडेंच्या शिस्तीमुळे काम व ताण वाढल्याने सहाजिकच अधिकाऱ्यांनीही नाराजीचाच सुर आळवला. (Beed News)
Tanaji Sawant-Tukaram munde News, Beed
Tanaji Sawant-Tukaram munde News, BeedSarkarnama
Published on
Updated on

बीड : आरोग्य संस्थांना अचानक भेटी, मुख्यालयी न राहणाऱ्यांना वेतनकपात व घरभाडे कपातीच्या नोटीसा, २४ तास ड्युटी करा, इंटर्नशिप करणाऱ्यांनीही ड्युटी करावी लागेल, अशी नियमानुसार शिस्त घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोग्य अभियान Tukaram Mundheआयुक्त तुकाराम मुंडे यांना डॉक्टर कर्मचाऱ्यांच्या संघटनांचा सुरुवातीपासूनच विरोध होता. Tanaji Sawant आता खात्यांतर्गत राजकीय वर्तुळातही त्यांच्याबद्दल रोष टोकाला गेल्याने त्यांच्या बदलीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

Tanaji Sawant-Tukaram munde News, Beed
Aurangabad : दानवेसाहेब हे करा.. हर्षवर्धन जाधव तुमच्यासमोर लोटांगण घालत येईल..

भारतीय प्रशासन सेवेतील वरिष्ठ अधिकारी असलेले तुकाराम मुंडे जिल्ह्यातील ताडसोन्ना येथील रहिवाशी आहेत. शिस्तीचे अधिकारी अशी त्यांची प्रशासनात ख्याती आहे.(Beed News) त्यांच्या शिस्तीच्या बडग्यामुळे प्रशासन ताळावर येते आणि संबंधीत खात्याचा लाभ तळागळापर्यंत पोचतो. मात्र, त्यामुळे मग मुंडे स्थानिक सत्ताधाऱ्यांपासून खात्यालाही नकोसे होतात असा पुर्वानुभव आहे. (Tanaji Sawant)

त्यांचे व सत्ताधाऱ्यांचे खटके उडाल्याने त्यांच्या कायम बदल्या होतात आणि त्यांच्या समर्थनार्थ सामान्य लोकांचा त्यांच्या भूमिकेला पाठींबा मिळाल्याचे अनेक उदाहरणे आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुकाराम मुंडेंसारखा अधिकारी खात्याची आरोग्य सेवा सामान्यांपर्यंत पोचविल या भावनेने त्यांची आरोग्य अभियान आयुक्त म्हणून नेमणूक केल्याची माहिती आहे. मात्र, रुजू होताच तुकाराम मुंडे यांनी अगोदर वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त लावण्याचे काम हाती घेतले.

यासाठी रात्रीच्या वेळी अचानक आरोग्य संस्थांना भेटीचे सत्र सुरु झाले. मुख्यालयी न आढळणाऱ्यांना नोटीसा, त्यांचे घरभाडे भत्ता कपात करण्याचे आदेश, इनर्टनशिप करणाऱ्यांनी ड्युटीच केली पाहीजे यासाठी प्रयत्न, प्रतिनियुक्त्या बंद करा असे एक ना अनेक आदेश दिले. त्यामुळे उंटावरुन शेळ्या हाकणाऱ्या आणि कधीतरी प्राथमिक आरोग्य केंद्राला सोयीनुसार चक्कर मारणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची तारांबळ उडायला सुरुवात झाली. अधिकाऱ्यांच्या संघटनांनी मुंडेंच्या निर्णयांना विरोधासाठी काळ्या फिती, सोशल मिडीयावर मतमतांतरे सुरु केली.

दरम्यान, खात्यात मंत्र्यांपेक्षा मुंडेंचीच चर्चा अधिक सुरु झाली. अधिकारी - कर्मचाऱ्यांच्या नाराजीचा फटका भविष्यात बसण्याची भितीही निर्माण झाली. दरम्यान, तसे आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या जवळचे आणि सत्तांतरापूर्वीच्या गुवहाटी दौऱ्यात मोलाचा वाटा उचलणारे आहेत. त्यांनाही मुंडे नकोसे झाले. त्यामुळे दहाएक दिवसांपूर्वी मंत्र्यांनी अनेक जिल्ह्यांतील जेष्ठ अधिकाऱ्यांना बोलावून मुंडेंबद्दल माहिती घेतली. मुंडेंच्या शिस्तीमुळे काम व ताण वाढल्याने सहाजिकच अधिकाऱ्यांनीही नाराजीचाच सुर आळवला.

Tanaji Sawant-Tukaram munde News, Beed
Sharad Pawar : विद्यापीठ नामांतराच्या संघर्षाची किंमत मलाही मोजावी लागली..

त्यानंतर चार दिवसांनी मंत्री तानाजी सावंत यांनी बोलावून मुंडेंना काही सुचनाही दिल्या. तेवढ्यावर न थांबता मुंडे आपल्या खात्यात नकोत, असा आग्रहच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धरला आणि शिंदेही राजी झाल्याची माहिती आहे. त्यामुळे तुकाराम मुंडे यांच्या बदलीच्या प्रक्रीयेला वेग आला आहे. मुंडे अल्पकाळच टिकतात असे जुने अनुभव असले तरी ते आरोग्य विभागात रुजू होऊन पुरते दोनेक महिनेही झाले नाहीत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com