Beed : पाहणीची औपचारिकता करणाऱ्या पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील हाहाकारही पहावा

शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्यानंतर प्रशासनाने पंचनामे केले आणि ४८ महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना पीक विमा २५ टक्के अग्रीम द्यावा, अशी अधिसुचना काढली. (Beed News)
Guardian Minister Atul Save News, Beed
Guardian Minister Atul Save News, BeedSarkarnama

बीड : अगोदर पावसाने ओढ दिल्याने सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. तर, मागच्या काही दिवसांपासून अतिवृष्टीने जिल्ह्यात हाहाकार माजविला आहे. (Beed) मात्र, प्रशासनाच्या पातळीवर हालचाली सुरु असल्या तरी शासनाला काही देणे - घेणे आहे का, प्रश्न आहे.

सरकारचे प्रतिनिधी असलेले पालकमंत्री अतुल सावे (Atul Save) यांनी केवळ गेवराईजवळ येत नुकसानीच्या पाहणीची औपचारिकता पुर्ण केली आहे. (Farmers) साधारण तीन महिन्यांपासून जिल्ह्याची धुरा प्रशासनाच्याच खांद्यावर आहे.

अगोदर पालकमंत्री नसताना आणि आता असूनही. जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भेटल्यानंतरही अतुल सावे यांना प्रशासनासोबत बैठक घ्यायला लवकर मुहूर्त लागला नव्हता. त्यानंतर जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून पहिल्यांदा आल्यानंतरही वन - बाय वन अधिकाऱ्यांकडून दोन - दोन मिनीटांत त्यांनी आढावा उरकून टाकला आणि एक पत्रकार परिषद घेऊन औपचारिकता पूर्ण करुन टाकली.

मात्र, संघटनांचे सत्कार आणि भेटी - गाठींसाठी मात्र त्यांना पुरेसा वेळ काढला होता. दरम्यान, यंदा निसर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर कोपला आहे. अगोदर पावसानंतर खरीपाची पेरणी झाली. मात्र, नंतर पावसाने उघडीप दिल्यानंतर दुबार पेरणीचे संकट उद॒भवले. त्यानंतर गोगलाईंनी सोयाबीन पिकांवर प्रादुर्भाव केला. त्यामुळेही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

नंतर ऑगस्ट महिन्यात वरुणराजाने चांगलेच डोळे ओटारले. काही भागात २१ दिवस तर काही भागात २५ दिवस पाऊस नव्हता. सोयाबीनला शेंगा लगडण्याचा हा कालावधी होता. त्यामुळे शेंगांमध्ये सोयाबनीच्या बियाच मोठ्या होऊ शकल्या नाहीत. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्यानंतर प्रशासनाने पंचनामे केले आणि ४८ महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना पीक विमा २५ टक्के अग्रीम द्यावा, अशी अधिसुचना काढली.

या काळात जिल्ह्याला पालकमंत्रीच नव्हते. मात्र, पालकमंत्री म्हणून भाजपचे अतुल सावे यांच्या गळ्यात माळ पडल्यानंतर शेतकऱ्यांना काही दिलासा मिळेल, ही अपेक्षा फोल ठरत आहे. त्यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सर्व जिल्ह्यातील विमाधारक शेतकऱ्यांना अग्रीम भेटण्याबाबत प्रयत्न सुरु असल्याचे सांगीतले. मात्र, नेमके यानंतर कंपनीने अगोदरच १५ महसूल मंडळे टाळली होती. आता तर जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिसुचनेतील २० महसूल मंडळे वगळली आहेत.

Guardian Minister Atul Save News, Beed
Shivsena : ये डर जरूरी है.. अंधेरीतील माघारीनंतर उद्धवसेनेने भाजपला डिवचले..

मागच्या काही दिवसांपासून जिल्ह्यात रोज परतीचा पाऊस जोरदार हजेरी लावत आहे. अनेक महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. आष्टी तालुक्यातील काही भागात तर ढगफुटी सदृष्य पाऊस झाला आहे. शेतातील काढून टाकलेले व उभे असलेले सोयाबीन पिक पाण्याने घेरले आहे. त्यामुळे पीक पूर्णत: सडून गेले आहे. कापसाचीही हीच गत आहे.

फुटलेल्या कापसाच्या वाती झाल्या असून दोड्यांना कोंब फुटत आहे. प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकारी शेतांच्या बांधावर जात आहेत. मात्र, शासनाचे प्रतिनिधि असलेले पालकमंत्री अतुल सावे यांनी वाटेवर असलेल्या गेवराई जवळ येत पाहणीची औपचारिकता पूर्ण केली आहे. त्यानंतरही रोजच पाऊस असल्याने जिल्हाभरात मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल आहेत. आता तरी अतुल सावे यांनी जिल्ह्यात येऊन नुकसानीची पाहणी करावी, अशी मागणी होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com