Vilas Ghule murder case : बीडमध्ये विलास घुले हत्या प्रकरण तापलं; मेहुण्याचा कलेक्टर ऑफिसवर चढून आत्महत्येचा प्रयत्न, DGP दाते जिल्ह्यात असतानाच मोठा ड्रामा

Vilas Ghule murder case Beed Maharashtra : बीडमधील विलास घुले हत्या प्रकरणाला नवे वळण; मेहुण्याने जिल्हाधिकारी कार्यालयावर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला. प्रकरणातील ताज्या घडामोडी जाणून घ्या.
Vilas Ghule murder case : बीडमध्ये विलास घुले हत्या प्रकरण तापलं; मेहुण्याचा कलेक्टर ऑफिसवर चढून आत्महत्येचा प्रयत्न, DGP दाते जिल्ह्यात असतानाच मोठा ड्रामा
Published on
Updated on

Beed News : विलास घुले हत्या प्रकरणात संशयित मुख्य आरोपीलाअटक करा, या मागणीसाठी रमेश घुले आणि त्यांच्या कुटुंबियांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले. या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. रमेश घुले यांची प्रकृती बिघडल्याने बीडमधील वातावरण तापले आहे. राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते हे कालपासून बीड दौऱ्यावर आहेत.

अशातच आज विलास घुले यांचे मेहुणे तानाजी घुले व अन्य एकजण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर चढले. तानाजी घुले याने आरोपीच्या अटकेची मागणी करत गळ्यात दोरीने फास लावून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे एकच गोंधळ उडाला. पोलीसांचीही धावपळ सुरू झाली.

Vilas Ghule murder case : बीडमध्ये विलास घुले हत्या प्रकरण तापलं; मेहुण्याचा कलेक्टर ऑफिसवर चढून आत्महत्येचा प्रयत्न, DGP दाते जिल्ह्यात असतानाच मोठा ड्रामा
शिक्षक होण्याचं स्वप्न पूर्ण होणार! 30,000 जागांसाठी 'पवित्र' पोर्टलवर अर्ज सुरु; 5 मिनिटांत असा भरा फॉर्म!

पोलीस महासंचालक सदानंद दाते आज बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. परळी, घाटनांदूर येथील दौरा आटोपून दाते हे बीड येथील पोलीस मुख्यालयात दाखल झाले असून गंभीर गुन्ह्यांचा सखोल आढावा घेत आहेत. मात्र, एकीकडे राज्याचे सर्वोच्च पोलीस प्रमुख जिल्ह्यात हजर असताना, दुसरीकडे न्यायासाठी पीडित कुटुंबातील सदस्यावर थेट शासकीय इमारतीवर चढण्याची वेळ आली.

विलास घुले हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करावी, या मुख्य मागणीसाठी घुले कुटुंबीयांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या तीन दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू आहे. मात्र, सलग तीन दिवस उलटूनही पोलीस किंवा जिल्हा प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेतली नाही.

प्रशासकीय अनास्थेला कंटाळून आज विलास घुले यांचे मेहुणे तानाजी घुले हे अचानक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर चढले. त्यांच्यासोबत हनुमंत घुले हेदेखील होते. इमारतीवर चढून तानाजी घुले यांनी चक्क गळ्यात दोर टाकून फास आवळत आरोपींना तात्काळ अटक करा, नाहीतर मी फास घेईन, असा आक्रमक पवित्रा घेतला.

Vilas Ghule murder case : बीडमध्ये विलास घुले हत्या प्रकरण तापलं; मेहुण्याचा कलेक्टर ऑफिसवर चढून आत्महत्येचा प्रयत्न, DGP दाते जिल्ह्यात असतानाच मोठा ड्रामा
CM Vijay divorce Case : मुख्यमंत्री विजय यांच्या पत्नीचा अनपेक्षित निर्णय; घटस्फोटाची याचिका घेतली मागे, नेमकं काय घडलं?

दरम्यान, दुसरीकडे सलग तीन दिवसांच्या अन्नत्यागामुळे उपोषणकर्ते रमेश घुले यांची प्रकृती खालावली आहे. घटनास्थळी आलेल्या डॉक्टरांनी त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, जोपर्यंत विलास घुले यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींना गजाआड केले जात नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही आणि रुग्णालयातही हलवू देणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतल्याने घटनास्थळी तणाव निर्माण झाला आहे.

​ऐन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात घडलेल्या या थरारक प्रकारामुळे पोलीस यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली. तानाजी घुले यांना इमारतीवरून सुखरूप खाली उतरवण्यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com