CM Vijay divorce Case : मुख्यमंत्री विजय यांच्या पत्नीचा अनपेक्षित निर्णय; घटस्फोटाची याचिका घेतली मागे, नेमकं काय घडलं?

Vijay CM wife divorce petition withdrawn : मुख्यमंत्री विजय यांच्या पत्नीने घटस्फोटाची याचिका मागे घेतल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामागे नेमकं काय घडलं आणि प्रकरणातील ताज्या घडामोडी जाणून घ्या.
Chief Minister Vijay wife withdraws divorce petition
Chief Minister Vijay wife withdraws divorce petitionSarkarnama
Published on
Updated on

तामिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या प्रकरणाला आता अनपेक्षित वळण मिळाले आहे. विजय यांच्या पत्नी संगीता यांनी चेंगलपट्टू न्यायालयात दाखल केलेली घटस्फोटाची याचिका मागे घेतली आहे. त्यामुळे विजय आणि संगीता यांच्या घटस्फोटाच्या प्रकरणावर न्यायालयाने पडदा टाकला आहे.

संगीता यांनी यावर्षी फेब्रुवारीमध्ये जोसेफ विजय यांच्यापासून घटस्फोट घेण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. वैवाहिक जीवनातील मतभेद हे घटस्फोटाचे कारण असल्याचे त्यांनी याचिकेत नमूद केले होते. यासोबतच पोटगीची मागणी तसेच चेन्नईतील नीलंकराई येथील दाम्पत्याच्या घरात राहण्याची परवानगी देण्याची मागणीही करण्यात आली होती.

Chief Minister Vijay wife withdraws divorce petition
Kangana Ranaut : 'गटर पिढी' ते 'तरुणचं देशाचं खरं..! Gen Z बद्दल कंगना रनौत यांचा अचानक यू-टर्न; नक्की काय घडलं?

या प्रकरणात एका अभिनेत्रीशी संबंधित आरोपांचीही चर्चा झाली होती. संगीता यांनी विजय यांचे एका महिला अभिनेत्रीशी संबंध असल्याचा दावा केला होता. त्याची माहिती आपल्याला 2021 मध्ये मिळाल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर आपण विजय यांच्यापासून वेगळे होऊ इच्छित असल्याचे त्यांनी न्यायालयात सांगितले होते.

मात्र आता संगीता यांनी अचानक आपली घटस्फोटाची याचिका मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. चेंगलपट्टू न्यायालयातील सुनावणीदरम्यान त्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाल्या आणि त्यांनी आपला निर्णय न्यायाधीशांना कळवला. “I don't want to pursue the case further,” असे सांगत त्यांनी हे प्रकरण पुढे न नेण्याची भूमिका स्पष्ट केली.

या प्रकरणाची सुनावणी यापूर्वी अनेकदा पुढे ढकलण्यात आली होती. विजय आणि संगीता दोघेही काही सुनावण्यांना हजर नव्हते त्यामुळे हे प्रकरण लांबले होते. त्यानंतर 7 August रोजी सुनावणी निश्चित करण्यात आली होती. त्याच दिवशी संगीता यांनी याचिका मागे घेतल्याने न्यायालयाने प्रकरण बंद केले.

Chief Minister Vijay wife withdraws divorce petition
Teacher Recruitment 2026 : कोल्हापुरात 606 शिक्षक भरती होणार, कोणत्या विषयाला किती शिक्षक सेवेत घेणार? जाणून घ्या

दरम्यान, हे प्रकरण न्यायालयाबाहेरच सोडवण्याच्या हालचाली सुरू असल्याचीही चर्चा होती. विजय हे संगीता आणि त्यांच्या मुलांना 240 कोटी रुपयांची पोटगी देण्यास तयार असल्याचा दावा काही अहवालांमध्ये करण्यात आला होता. मात्र या दाव्याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही.

जोसेफ विजय आणि संगीता यांनी 25 ऑगस्ट 1999 रोजी चेन्नईमध्ये पारंपरिक हिंदू पद्धतीने आंतरधर्मीय विवाह केला होता. विजय यांच्या राजकीय कारकिर्दीला वेग आल्यानंतर आणि ते तमिळनाडूचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित या प्रकरणाने मोठे लक्ष वेधून घेतले होते. आता संगीता यांनी घटस्फोटाची याचिका मागे घेतल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com