Beed Municipal Election Violence: गेवराईत तुफान राडा: पंडित-पवार गट आमने- सामने; गाड्यांच्या काचा फोडल्या अन् दगडफेकही!

Beed Georai Municipal Election Violence : गेवराईत पंडित-पवार गटामध्ये तुफान राडा झाला. दगडफेक, गाड्यांच्या काचा फोडल्याच्या घटनांमुळे परिसरात तणाव वाढला आहे. संपूर्ण बातमी जाणून घ्या.
Beed Municipal Election Violence
Beed Municipal Election ViolenceSarkarnama
Published on
Updated on

सुभाष मुळे

Local Body Election : गेवराई नगरपालिकेच्या निवडणुक प्रचारात एकमेकांवर टीकेचा भडीमार करणारे भाजपाचे माजी आमदार लक्ष्मण पवार आणि राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडित यांच्या समर्थकांमध्ये आज ऐन मतदानाच्या दिवशीच मोठा राडा झाला. एकमेकांच्या बंगल्यावर चाल करून जाण्याचा प्रयत्न झाल्याने गेवराईत तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या बंगल्यासमोरील गाडीवर पंडित समर्थकांनी दगड घालत ती फोडली. त्यानंतर स्वतः पवार हे पंडित समर्थकांच्या अंगावर धावून जातांना दिसले.

त्यानंतर अचानक दोन्ही बाजूच्या समर्थकांकडून दगडफेक आणि पळापळ सुरू झाली. पोलीसांनी जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या घटनेत एक जण जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी अद्याप पोलीसात तक्रार किंवा गुन्हा दाखल झालेला नाही. परंतु पंडित आणि पवारांच्या बंगल्यासमोर पोलीसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला असून शहरात तणावाची परिस्थिती आहे.

गेवराई येथील नगर परिषद निवडणुकीसाठी आज प्रत्यक्ष मतदानाला सुरवात झाली. भाजपच्या उमेदवार गीता त्रिंबक उर्फ बाळाराजे पवार या प्रभाग क्रमांक 10 मधील मतदान केंद्रावर आल्या होत्या. तेव्हा तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजयसिंह पंडित यांचे पुतणे पृथ्वीराज जयसिंग पंडित हे समोरा समोर आले. यावेळी भाजपच्या उमेदवार गीता पवार यांना कमी लेखण्याच्या उद्देशाने पृथ्वीराज पंडित यांनी टाळ्या वाजवल्या. याचा जाब पवार यांनी विचारताच दोघांच्या समर्थकांमध्ये वादावादी झाली.

त्याचे पडसाद नंतर बाहेर एकमेकांच्या बंगल्यावर धावून जाणे, हाणामारी, दगफेकीच्या घटनेतून उमटले. रस्त्यावरील वाहनाची तोडफोड, दगडफेक दोघांचे समर्थक आक्रमक झाल्याने एकच धावफळ उडाली. यात एक जण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शहरात आज सकाळी मतदानाला सुरवात झाल्यानंतर जेव्हा आजी- माजी आमदारांचे समर्थक समोरासमोर आले तेव्हाच संघर्षाचा भडका उडाला. शाब्दिक चकमकीचे रुपांतर मोठ्या वादा आणि नंतर मारहाण व दगडफेकीत झाले.

Beed Municipal Election Violence
Jyotiraditya Scindia : मोदी सरकारच्या 'त्या' निर्णयामुळे खळबळ; वादानंतर ज्योतिरादित्य शिंदेंची सपशेल माघार

शहरात तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्याने पोलिसांनी तातडीने बंदोबस्त वाढवला आहे. घटनेनंतर शहरातील प्रमुख मार्ग, चौक तसेच राजकीय नेत्यांच्या निवासस्थानांवर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दोन्ही पंडित यांचे बंगले, पवार यांचे निवासस्थान परिसर, बसस्टँड, मार्केट परिसर, नगरपरिषद कार्यालय परिसरात अतिरिक्त पोलीस तुकड्या, तसेच गुन्हे शाखेचे अधिकारी तैनात आहेत.

दगडफेकीत जखमी झालेल्या व्यक्तीची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले. त्याच्या जवाबावरून पुढील गुन्हा नोंदवला जाणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. घटनेनंतर सोशल मीडियावर परिस्थितीबाबत चुकीची माहिती वा अफवा पसरू नये, यासाठी पोलिसांनी विशेष लक्ष ठेवले आहे. नागरिकांनी शांतता राखावी, तसेच कोणतीही न पडताळलेली माहिती शेअर करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

Beed Municipal Election Violence
How to Check name voter list... : आता फक्त 2 मिनिटात! असे शोधा मतदार यादीत आपले नाव आहे की नाही?

राजकीय वर्तुळात खळबळ

अकस्मात घडलेल्या या प्रकारामुळे गेवराईच्या राजकीय परीस्थितीत खळबळ उडाली असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संयम पाळण्याचे आवाहन करण्यास सुरुवात केली आहे.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com