Nanded Congress News : भोकरमध्ये काँग्रेस फुटली; पण पदाधिकाऱ्यांचा ओढा भाजपऐवजी अजितदादांच्या राष्ट्रवादीकडे!

Congress officials resign from Bhokar constituency and join NCP : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला म्हणून भोकर मतदारसंघ ओळखला जातो. काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेल्यानंतरही चव्हाण यांनी कन्या श्रीजया यांना निवडून आणत हा मतदारसंघ आपल्याकडे राखला.
Nanded Congress News
Nanded Congress NewsSarkarnama
Published on
Updated on

नांदेड : आगमी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका पाहता नांदेड जिल्ह्यात काँग्रेस मधून मोठ्या प्रमाणात आऊट गोईंग सुरू झाले आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शिल्लक काँग्रेस त्यांच्यासोबत जाईल, असे वाटले होते. पण पक्षाने सगळे देऊन गद्दारी केल्याचा राग काँग्रेसच्या स्थानिक नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये होता. काही काँग्रेसमधील चव्हाण समर्थकांनी भाजप मध्ये जाण्याचा निर्णय घेतला.

पण भोकर मतदारसंघातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यावर असलेली नाराजी कायम आहे. त्यामुळे भोकरमधील अनेक पदाधिकारी हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे चित्र आहे. काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर, उपाध्यक्ष सुरेश बिल्लेवाड यांच्यासह युवक काँग्रेसच्या बहुसंख्य पदाधिकाऱ्यांनी आज (ता.16)आपल्या पदांचे राजीनामे जिल्हाध्यक्षांकडे पाठवल्याने तालुक्यात खळबळ उडाली.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला म्हणून भोकर मतदारसंघ ओळखला जातो. काँग्रेस (Congress) सोडून भाजपमध्ये गेल्यानंतरही चव्हाण यांनी कन्या श्रीजया यांना निवडून आणत हा मतदारसंघ आपल्याकडे राखला. पण त्यांच्याबद्दल मतदारसंघातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये असलेली नाराजी कायम आहे. काँग्रेसचे माजी कृषी सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर, माजी सरपंच तथा उपनगराध्यक्ष गोविंदबाबा गौड पाटील,माजी जि.प.सदस्य प्रकाश देशमुख भोसीकर या अशोक चव्हाण समर्थकांनी त्यांच्यासोबत भाजपात न जाता काँग्रेसमध्येच राहणे पसंत केले.

Nanded Congress News
Maharashtra Congress President : नाना पटोलेंचे पायउतार होण्याचे संकेत? चव्हाण, थोरात, कदम, ठाकूर, देशमुख चर्चेत...

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे लोकसभा उमेदवार दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांना साथ देत त्यांना निवडून आणण्यात महत्वाची भूमिका बजावली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे प्रकाश देशमुख भोसीकरांनी भाजपत प्रवेश केला. परंतु इतर पदाधिकारी काँग्रेसमध्ये थांबले.

Nanded Congress News
NCP Shirdi Shibir : आता राष्ट्रवादी काँग्रेसचही शिबिर होणार शिर्डीतच!, सदस्य नोंदणी अभियानसही करणार सुरुवात

आज अचानक पक्षातील रावणगाकर, तालुकाध्यक्ष गोविंदबाबा गौड पाटील, काँग्रेसचे माजी कृषी सभापती तथा बाजार समितीचे व मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब पाटील रावणगावकर,पंचायत समितीचे माजी उपसभापती सुरेश बिल्लेवाड यांच्यासह सावरगाव, महागाव, डौर, पोमनाळा, लगळूद, किनी, पाळज, मातुळ येथील तालुका युवक काँग्रेसच्या असंख्य पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे जिल्हाध्यक्ष बी.आर.कदम यांच्याकडे पाठवले.

Nanded Congress News
Ajit Pawar Vs BJP : भाजप अजितदादांच्या पोस्टरला काळं फासण्याच्या तयारीत, युतीमध्येही वादाची ठिणगी?

दरम्यान, शनिवारी (ता. 19) शिर्डी येथे होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित भोकर तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे राजीनामे दिलेले हे सर्व पदाधिकारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com