Bhokardan News : अयोध्येत राम मंदिर निर्माण आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा झाल्यानंतर आलेल्या पहिल्या राम नवमीचा उत्साह देशभरात शिगेला पोहोचला होता. त्यातच लोकसभा निवडणुका जाहीर झालेल्या असल्याने राम नवमीच्या मिरवणुकीत राजकीय नेत्यांची मांदियाळी होती. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आपल्या भोकरदन येथील राम नवमी उत्सव आणि त्यानिमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणुकीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या मिरवणुकीत प्रभू श्रीरामाची प्रतिमा असलेल्या रथाचे सारथ्य स्वत: दानवे (Raosaheb Danve) यांनी केले. तसेच मिरवणुकीत घोड्यावर बसून झेंडा उंचावत राम भक्तांचा उत्साह वाढवल्याचे दिसून आले. `हर घर में अब एकही नाम, एकही नारा गुंजेगा, जय श्री रामच्या घोषणांमध्ये शहर दुमदुमले होते. प्रभू श्री राम नवमी उत्सवानिमित्त भव्य शोभा यात्रा काढण्यात आली होती.
यात सहभागी होत राम (Ram) भक्तांसमवेत श्री राम नामाचा जयघोष दानवे यांनी करत उत्साह वाढवला. अयोध्या येथील प्रभू श्री राम मंदिर निर्माणामुळे सर्व देशभरात नव चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. या वातावरणाची प्रचिती राम नवमी उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये दिसून आल्याचे दानवे यांनी म्हटले. लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोमात असताना राम नवमी उत्सवातही तोच जोश दिसून आला.
महायुतीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते या शोभा यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रावसाहेब दानवे यांनी शोभा यात्रेतील श्रीरामांच्या रथाचे सारथ्य करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या शिवाय मिरवणुकीत घोड्यावर बसून दानवे भगवा झेंडा फडकवत जय श्रीरामच्या घोषणा देत होते. रावसाहेब दानवे हे जालना लोकसभा मतदारसंघातून सहाव्यांदा निवडणूक लढवत आहेत.
त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीचे कल्याण काळे मैदानात आहेत. येत्या 13 मे रोजी जालना लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. तत्पूर्वी महायुती- महाविकास आघाडी अशा दोन्ही बाजूंनी प्रचाराला वेग आला असून, आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
या निवडणुकीच्या धामधुमीतून थोडी उसंत घेत सर्वच राजकीय पक्षांनी राम नामाचा घोष करत राम नवमी उत्सवात सहभा नोंदवल्याचे दिसून आले. रावसाहेब दानवे यांचा उत्साह पाहण्यासारखा होता. आता शोभा यात्रेत राम रथाचे सारथ्य करणाऱ्या रावसाहेब दानवे यांना सहाव्या विजयाच्या रूपात प्रभू रामाचा आशीर्वाद मिळतो का? याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.