Mla Sanjay Shirsat- Sandipan Bhumre-Abdul Sattar
Mla Sanjay Shirsat- Sandipan Bhumre-Abdul SattarSarkarnama

शिंदेंच्या मंत्रीमंडळात भुमरेंना डच्चू ? शिरसाटांना संधी, तर सत्तारांना प्रमोशन?

शिरसाट आता आपल्याला संधी मिळावी यासाठी आग्रही आहे. शिवाय राज्यमंत्री नको तर कॅबिनेटच हवे असा देखील त्यांचा आग्रह असल्याची माहिती आहे. ( Shivsena-Bjp)
Published on

औरंगाबाद : शिवसेनेतून बाहेर पडून एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडाला औरंगाबाद जिल्ह्याने भक्कम साथ दिली. (Eknath Shinde) जिल्ह्यातील ७ पैकी ५ तर मराठवाड्यातील १२ पैकी ८ आमदार या बंडात सामील झाले. पैकी संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे दोघे महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होते. भाजपच्या राजकीय खेळीनंतर एकनाथ शिंदे यांना अनपेक्षितपणे मुख्यमंत्रीपद मिळाले, तर पुन्हा येईन म्हणणाऱ्या फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे लागले.

१६ बंडखोर आमदरांवरील निलंबनाच्या कारवाईची सुनावणी, विधानसभा अध्यक्ष पदाची निवड अन् बहुमत चाचणीची अग्नीपरिक्षा पास झाल्यानंतर मंत्रीमंडळाचा शपथविधी होईल. (Aurangabad) तत्पुर्वी शिंदेच्या मंत्रीमंडळात कोण कोण असेल याबद्दल अनेक तर्क लवढवले जात आहेत. मुख्यमंत्रीपद मिळाल्यामुळे शिंदे यांची जबाबदारी आता आणखी वाढली असून अपक्ष आणि सोबत आलेल्या ३९ आमदरांपैकी कुणाला मंत्री करावे, हे ठरवतांना त्यांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे.

तर दुसरीकडे भाजप आगामी महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका व २०२४ डोळ्यासमोर ठेवून अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता आहे. औरंगाबाद जिल्ह्याची शिंदेच्या बंडातील भूमिका पाहता महाविका आघाडी प्रमाणेच दोन मंत्रीपद दिली जातील अशी शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार हे अनुक्रमे कॅबिनेट व राज्यमंत्री होते. भुमरे यांनी अडीच वर्ष मंत्रीपद भोगले आहे, त्यामुळे त्यांच्याऐवजी आता संजय शिरसाट यांना संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे.

आघाडी सरकारच्या मंत्रीमंडळात स्थान मिळावे यासाठी संजय शिरसाट व भुमरे या दोघांनीही आपापल्या परीने प्रयत्न केले होते. पण भुमरे हे पाचवेळा विधानसभेवर निवडून गेल्यामुळे पक्षनेतृत्वाने त्यांना थेट कॅबिनेट मंत्री केले. त्यामुळे संजय शिरसाट कमालीचे नाराज झाले होते. त्यामुळे शिंदे यांच्या बंडात खांद्याला खांदा लावून सहभागी झालेले शिरसाट आता आपल्याला संधी मिळावी यासाठी आग्रही आहे.

Mla Sanjay Shirsat- Sandipan Bhumre-Abdul Sattar
Aurangabad : आता चांगल्या पोस्ट फिरीवं, मिरच्या झोंबल्या पाहिजे.. भुमरेंचा काॅल व्हायरल..

शिवाय राज्यमंत्री नको तर कॅबिनेटच हवे असा देखील त्यांचा आग्रह असल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे राज्यमंत्री राहिलेले अब्दुल सत्तार हे शिवसेनेत दाखल झाले तेव्हा त्यांना सत्ता आल्यानंतर कॅबिनेटमंत्री करण्याचे आश्वासन देण्यात आले होते असे सांगितले जाते. पण राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग झाला आणि वाटेकरी वाढल्यामुळे सत्तार यांनी ठाकरेंनी राज्यमंत्रपदावर बोळवण केली होती.

तेव्हा नाइलाज म्हणून त्यांनी ते स्वीकारले होते. पण विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीत आपली उपद्रव शक्ती दाखवून त्यांनी शिंदे यांच्या बंडाला बळ दिले होते. तेव्हा सत्तार यांचे शिंदेंच्या मंत्रीमडळात प्रमोशन होण्याची शक्यता आहे. शिरसाट की भूमरे असा पेच या निमित्ताने निर्माण झाला असून मुख्यमंत्री शिंदे हे तो कसा सोडवतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com