Amit Shah Maharashtra : महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटणार? अमित शाहांची शिंदे-फडणवीस-पवारांसोबत 'या' दिवशी बैठक

Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar : भाजपने आपली लोकसभेच्या 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश नाही.
Amit Shah
Amit ShahSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीला 400 हून अधिक जागा मिळवण्यासाठी भाजपने चंग बांधला आहे. यात 370 जागा या फक्त भाजपच्याच असतील, असा दावाही करण्यात येत आहे. याच धर्तीवर महायुतीतील घटक पक्षांनी महाराष्ट्रात 48 पैकी 45 जागा मिळवण्याचे ध्येय बाळगले आहे.

दरम्यान, महायुतीत जागावाटात एकवाक्यता नसल्याने राज्यात तिढा कायम आहे. यावर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह मंगळवारी (ता. 5) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत बैठक घेणार असल्याची माहिती आहे. (Amit Shah Maharashtra)

Amit Shah
BJP Lok Sabha Candidate First List : 'मिशन 45'चा दावा, पण भाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्राला स्थानच नाही

राज्यात महायुतीतील भाजपला 32, शिवसेना शिंदे गटास 12 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 4 जागा अशा फॉर्म्युल्याची चर्चा आहे. यावर शिंदे गटासह राष्ट्रवादीनेही नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्यात महायुतीतील लोकसभा जागावाटपाचा तिढा कायम आहे. दरम्यान, भाजपने आपली लोकसभेच्या 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

या यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश नसल्याने चर्चांना उधाण आले आहे. हा तिढा सोडवण्यासाठीच अमित शाह (Amit Shah) हे शिंदे-फडणवीस-पवारांसोबत बैठक घेणार असल्याचे बोलले जात आहे. या बैठकीनंतर दुसऱ्या यादीत राज्यातील उमेदवारांचा समावेश असण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Amit Shah
Amol Kolhe News : फडणवीसांचं भाषण कानावर पडण्याआधीच अमोल कोल्हे, अशोकबापूंनी घेतला काढता पाय

लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha Election) एप्रिल किंवा मे महिन्यात होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अमित शहा 5 मार्च रोजी महाराष्ट्रातील अकोला, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर येथे भाजपच्या निवडणूक संबंधित बैठका आणि कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. चंद्रपूर, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वर्धा आणि अमरावती या मतदारसंघांबाबतही ते आढावा घेणार आहेत. अकोल्यानंतर शहा जळगाव येथील पक्षाच्या कार्यक्रमात संबोधित करणार आहेत. त्यानंतर सायंकाळी छत्रपती संभाजीनगर येथे शाह यांची जाहीर सभा होणार आहे.

दरम्यान, शहा यांच्या दौऱ्यापूर्वीच 4 मार्चला भाजप अध्यक्ष जे. पी नड्डा नागपुरातील 'नमो युवा संमेलना'त तरुणांशी संवाद साधणार आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे 6 मार्च रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 'नारी शक्ती वंदना' कार्यक्रमाला संबोधित करणार असल्याचेही भाजप नेत्यांनी सांगितले आहे. या पाठोपाठ कार्यक्रमांनी राज्यात भाजपने वातावरण तापवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Amit Shah
Anil Desai News : मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अनिल देसाईंना बजावले समन्स; 'हे' आहे कारण

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com