Ashok Chavan: नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना मोठा धक्का; अवघ्या 7 महिन्यांतच जवळचा माणूस काँग्रेसमध्ये परतणार

Bhaskarrao Khatgaonkar And Minal Khatgaonkar News : एकीकडे काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण यांचं निधन झाल्यामुळे नांदेडमध्ये पोटनिवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. अशातच आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठीही नांदेडमध्ये जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. पक्षांतराचे वारे वाहू लागले आहे.
Ashok chavan
Ashok chavanSarkarnama
Published on
Updated on

Nanded News : अशोक चव्हाणांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. हा केवळ नांदेडच नाही तर काँग्रेस आणि महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का होता. चव्हाण यांच्यासोबत कोण कोण भाजपमध्ये जाणार याची चर्चा सुरू झाली. तेव्हा त्यांच्यासोबतच त्यांचे मेहुणे तथा माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनीही भाजपात प्रवेश केला होता.

एकीकडे काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण यांचं निधन झाल्यामुळे नांदेडमध्ये पोटनिवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. अशातच आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठीही नांदेडमध्ये जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. पक्षांतराचे वारे वाहू लागले आहे. अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना भाजपनं राज्यसभेवर पाठवले, पण खतगावकरांचं काय? असा प्रश्न उपस्थित केला जात असतानाच आता त्यांची काँग्रेसमधील घरवापसी शिक्कामोर्तब झाले आहे.

माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे मेहुणे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची भूमिका स्पष्ट केली आहे.बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.याच मेळाव्यात मीनल खतगावकर नायगाव विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून लढण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.

माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे मेहुणे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची भूमिका स्पष्ट केली आहे.बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.याच मेळाव्यात मीनल खतगावकर नायगाव विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून लढण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.

Ashok chavan
Sushilkumar Shinde's grandson : सुशीलकुमार शिंदेंच्या सेलिब्रिटी नातवाची विधानसभेसाठी सोलापूरमध्ये चर्चा!

खतगावकर म्हणाले,भाजपने आपल्याला आत्तापर्यंत तीनवेळा उमेदवारी डावलली. त्यामुळेच आपण काँग्रेसमध्ये परत जाण्याचा निर्णय घेतला.काँग्रेसकडून आपली सून मीनल खतगावकर यांना नायगाव मतदारसंघातून उमेदवारी दिली जाणार असल्याचा शब्द देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

वसंत चव्हाण यांचे निधन झाल्यानंतर आपल्याला भाजपकडून मोठा प्रस्ताव देण्यात आला होता.या प्रस्तावात मीनल खतगावकर यांनी नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक लढवावी असं भाजपाकडून सांगण्यात आलं होतं.मात्र,आपण हा प्रस्ताव हात जोडून नाकारल्याचेही खतगावकर यांनी सांगितले.नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काँगेसकडून दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांचे चिरंजीव रवींद्र चव्हाण यांनाच उमेदवारी देण्यात यावी असाही ठराव मंजूर करण्यात आला.

Ashok chavan
Maharashtra Vidhansabha Poll : 'पोल ऑफ पोल'ने वाढवलं महायुती, मविआचे टेन्शन, आकडे काय सांगतात?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com