Sushilkumar Shinde's grandson : सुशीलकुमार शिंदेंच्या सेलिब्रिटी नातवाची विधानसभेसाठी सोलापूरमध्ये चर्चा!

Assembly Election 2024 : सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचे नातू शिखर पहाडिया यांचे नाव पुढे आले आहे, त्यामुळे पहाडिया हे सुशीलकुमार शिंदेंचा राजकीय वारसा चालवू शकतात.
Sushilkumar Shinde-Shikhar Pahadia
Sushilkumar Shinde-Shikhar PahadiaSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 12 September : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापुरात विविध राजकीय नेत्यांची चर्चा सुरू आहे. यात प्रणिती शिंदे यांनी प्रतिनिधीत्व केलेल्या सोलापूर शहर मध्य मतदारसंघाची सर्वाधिक चर्चा आहे. या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकही मोठ्या प्रमाणात आहेत.

मात्र, आता या मतदारसंघातून ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचे नातू शिखर पहाडिया यांचे नाव पुढे आले आहे, त्यामुळे सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून प्रणिती शिंदे यांच्यानंतर नातू शिखर पहाडिया हे सुशीलकुमार शिंदेंचा राजकीय वारसा चालवू शकतात, अशी चर्चा सोलापूरच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांची ज्येष्ठ कन्या स्मृती पहाडिया यांचे शिखर पहाडिया हे चिरंजीव आहेत. शिंदे यांच्या तीन कन्यांपैकी दोघी राजकारणापासून अलिप्त आहेत. मात्र, तिसरी कन्या प्रणिती शिंदे या सुशीलकुमार शिंदेंचा राजकीय वारसा पुढे चालवत आहेत. प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून तीन वेळा विजय मिळवला आहे.

सोलापूर लोकसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे (Praniti shinde) या निवडून आल्यामुळे आता सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता आहे. सोलापूर शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्यासह अनेकजण या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र शिंदे यांच्या नातवाचेच नाव पुढे आले आहे. मात्र, काँग्रेस पक्ष आणि शिंदे कुटुंबीयांकडून त्याला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही.

Sushilkumar Shinde-Shikhar Pahadia
Vijaykumar Deshmukh : संघाच्या चिंतन बैठकीला आमदार विजयकुमार देशमुखांची दांडी; चर्चेला उधाण

दरम्यान, शिखर पहाडिया हे २०२३ मध्ये सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वराच्या यात्रेत सहभागी झाले होते. सोलापूरच्या सार्वजनिक कार्यक्रमात ते प्रथमच सहभागी झाले होते. त्या वेळी ते आजोबा सुशीलकुमार शिंदे यांचा राजकीय वारस चालविणार, अशी चर्चा रंगली होती. प्रणिती शिंदे या लोकसभेत गेल्यानंतर आता पुन्हा नातू शिखर पहाडिया हे विधानसभेत आजोबांचा वारसा चालवणार, अशी चर्चा सोलापूरच्या राजकीय वर्तुळात सध्या सुरू आहे.

शिखर पहाडिया यांनी सोलापुरातून निवडणूक लढवण्याचे ठरवले तर प्रणिती शिंदे यांनी प्रतिनिधित्व केलेल्या सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा राजकीय वारसा चालवणारे शिंदे घराण्यातील दुसरे व्यक्ती ठरू शकतात.

यासंदर्भात काँग्रेसचे सोलापूर शहरातील वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले, शिखर पहाडिया यांच्याबाबत पक्ष संघटनेला कुठलीही माहिती मिळालेली नाही. तसेच, शिखर पहाडिया यांनी सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून उमेदवारी मिळावी, यासाठी अर्जही केलेला नाही. त्यामुळे पहाडिया यांची विधानसभा निवडणुकीला इच्छूक असल्याची कुठलीही माहिती पक्षाकडे नाही.

Sushilkumar Shinde-Shikhar Pahadia
MIM-Shivsena Meeting : गुप्त बैठक कशासाठी..? उघडपणे युती करा; जलील-शिवसेना नेत्याच्या बैठकीवर शिरसाटांचा हल्ला

वरिष्ठ पातळीवरून अचानक त्यांचे नाव पुढे आले तर आम्हाला त्यांचे काम करावे लागेल, असेही एका पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com