Chh. SambhajiNagar Riot News: छत्रपती संभाजीनगर दंगल प्रकरणात मोठी अपडेट; धर्म अभ्यासकासह 'ते' 8 जण अद्यापही फरारच

SambhajiNagar Crime News : छत्रपती संभाजीनगर येथील घटनेत सुरुवातीला दोन गटातील वाद पोलिसांनी मिटवले होते.परंतू...
Chhatrapati SambhajiNagar Riots
Chhatrapati SambhajiNagar Riots Sarkarnama

Chhatrapati SambhajiNagar News: छत्रपती संभाजीनगर येथील किराडपुरा परिसरात रामनवमीच्या आदल्या रात्री दोन गटातील बाचाबाचीचे रुपातर दंगलीत होऊन मोठा हिंसाचार उसळला होता. या हिंसाचारात पोलिसांच्या १२ शासकीय व दोन कर्मचाऱ्यांच्या दुचाकी जाळण्यात आल्या होत्या. या घटनेनंतर सत्ताधारी विरोधकांमधील आरोप प्रत्यारोपांनी राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं होतं. मात्र, या घटनेला आता २५ दिवस उलटल्यानंतर मोठी अपडेट समोर आली आहे.

राज्य सरकारच्या एसआयटी (Special Investigation Team)विभागाकडून या किराडपुरातील दंगलीचा तपास सुरु आहे. या हिंसाचाप्रकरणी आत्तापर्यंत तब्बल ७९ दंगेखोरांना अटक करण्यात आली आहे. तसेच व्हॉट्सअ‌ॅपच्या माध्यमातून अफवा पसरवत जमाव जमा करण्यात आला असल्याचा निष्कर्ष एसआयटीनं काढला आहे. तसेच या घटनेला जबाबदार असणाऱ्या धर्म अभ्यासकासह 8 जण अद्यापही पसारच असल्याची धक्कादायक बाब एसआयटीच्या तपासानंतर समोर आली आहे.

या प्रकरणी एसआयटीचे प्रमुख वरिष्ठ निरीक्षक संभाजी पवार तसेच तपास अधिकारी अनिल मगरे यांच्यासह ९ अधिकारी व ३ कर्मचारी तपास करत आहेत.

Chhatrapati SambhajiNagar Riots
Eknath Shinde on Uddhav Thackeray : शिवसेना कुणाची हे सांगायला पाकिस्तानच्या प्रमाणपत्राची गरज ? ; मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना टोला

एसआयटी तपासात काय आलं समोर ?

छत्रपती संभाजीनगर येथील घटनेत सुरुवातीला दोन गटातील वाद पोलिसांनी मिटवले होते.परंतू, सात ते आठ जणांनी उपस्थित जमावात अफवा पसरवण्याचे काम केले. त्यात प्रामुख्याने मूळ बीडचा परंतु सहा वर्षांपासून जिन्सीत राहत असलेल्या स्वत:ला धर्म अभ्यासक म्हणवणाऱ्याचा समावेश असल्याचं समोर आलं आहे.

तसेच व्हॉट्सअ‌ॅपच्या माध्यमातून एका गटाच्या तरुणांना नाहक मारले, मारेकऱ्यांना पोलिसांनी मंदिरात लपवले, शहागंजमध्ये दंगल उसळली आहे यांसारख्या अफवा पसरवून तरुणांना जमा करण्यात आल्याचंही एसआयटीच्या तपासात उघड झालं आहे.

Chhatrapati SambhajiNagar Riots
Uddhav Thackeray on Farmers: 26 वर्षांच्या तरुणाने जीवन का संपवलं? उद्धव ठाकरेंनी सांगिंतलं खान्देशातलं भयाण वास्तव

मोबाइलमधील डेटा, व्हॉट्सअ‌ॅप कॉल हिस्ट्री डिलीट आणि...

छत्रपती संभाजीनगर(Chhatrapati SambhajiNagar) संबंधित संशयित आरोपींना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावल्यानंतर प्रत्येकजण मोबाइलमधील डेटा, व्हॉट्सअ‌ॅप कॉल हिस्ट्री डिलीट करून येत असल्याचेही समोर आले आहे. जे व्हॉट्सअ‌ॅपच्या माध्यमातून त्यावेळी व्हायरल करण्यात आले. अनेकांच्या बाबतीत पोलिसांकडून करण्यात आलेल्या तपासात ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

आत्तापर्यंतची एसआयटीची कारवाई

एसआयटीकडून आतापर्यंत किराडपुरा दंगलीप्रकरणी ७९ दंगेखोरांना अटक झाली असून एका संशयिताची चौकशी सुरू आहे. यात ११ अल्पवयीन असून त्यांना नोटीस देऊन सोडण्यात आले आहे. मात्र, या सर्व दंगेखोरांचे मोबाइल पोलिसांनी जप्त केले असून फॉरेन्सिक विभागाकडून तपासणी सुरू आहे. या सर्वांचे सबळ पुरावे पथकाने गोळा केले. शिवाय, दोन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून त्याची खातरजमा केल्यानंतरच अटक केली जात आहे.

Chhatrapati SambhajiNagar Riots
Gulabrao Patil On Thackeray: गुलाबरावांनी ठाकरे गटाच्या पाचोऱ्यातील सभेतील गर्दीचा दावा खोडून काढला; म्हणाले...

१४ गुन्हे दाखल, २२ तरुणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

यावेळी जमाव केवळ मंदिर व पोलिसांनाच लक्ष्य करण्यासाठी जमला होता हेही आता निष्पन्न झाले आहे. परिसरातील बहुतांश वाहने रस्त्यावर उभी होती. आतापर्यंत वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी पोलिस विभागाने १४ गुन्हे दाखल केले असून २२ तरुणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com