Gulabrao Patil On Thackeray: गुलाबरावांनी ठाकरे गटाच्या पाचोऱ्यातील सभेतील गर्दीचा दावा खोडून काढला; म्हणाले...

Uddhav Thackeray Pachora Rally : उध्दव ठाकरेंवर राग नाही पण....
Gulabrao Patil On Uddhav Thackeray rally
Gulabrao Patil On Uddhav Thackeray rally Sarkarnama
Published on
Updated on

Pachora News : माजी मुख्यमंत्री व शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे रविवारी (दि.२३) सभा झाली.जळगाव जिल्ह्यात ठाकरे गटाचा एकही आमदार नाही. चारही आमदार शिंदेंच्या गटात आहे. यामुळे ठाकरे गटाकडून कालच्या सभेद्ववारे जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न आला आहे.

या सभेला लाखांवर लोक उपस्थित होते असा दावाही ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. मात्र, शिंदे गटाचे नेते व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाच्या सभेतील गर्दीविषयीच्या दावा खोडून काढला आहे.

Gulabrao Patil On Uddhav Thackeray rally
Daund News : पक्ष संपवण्यासाठी राष्ट्रवादीची सुपारी; शिवसेना जिल्हा प्रमुखपदाचा राजीनामा देत पासलकरांचा गंभीर आरोप!

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांची खेड, मालेगावनंतर पाचोऱ्यात सभा झाली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह गुलाबरावा पाटलांवरही जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच ठाकरे गटाकडून सभेला लाखांवर शिवसैनिकांची उपस्थिती होते असा दावाही केला आहे. यावर आता गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटावर निशाणा साधतानाच सभेतील उपस्थितांची आकडेवारी सांगितली.

गुलाबराव पाटील(Gulabrao Patil) यांनी माध्यमांशी संवाद साधला.यावेळी पाटील म्हणाले,पाचोऱ्याच्या सभेत एक लाख खुर्च्या नव्हत्या. त्या मैदानाची क्षमताच 25 हजाराची आहे. उद्धव ठाकरे यांच्या सभेला 18 हजार खुर्च्या होत्या आणि सभेला 12 हजाराच्यावर लोकं नव्हते. एक लाख संख्या बसेल एवढं ग्राउंड जळगाव जिल्ह्यात नाही. मग पाचोऱ्यामध्ये कसं असणार? असा सवालच गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

Gulabrao Patil On Uddhav Thackeray rally
Shambhuraj Desai :...अन् शंभूराज देसाईंनी सपत्नीक फुगडी खेळत धरला विठ्ठल नामाचा ठेका

...आणि राऊत राजीनामा देणार पण नाही!

गुलाबरावांनी संजय राऊतांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला. यावेळी पाटील म्हणाले, आमच्या मतावर मोठे झालेले हे लोक यांचा काय संबंध? उलट स्वाभिमानी असाल तर त्यांनी राजीनामा द्यावा. आमची 41 मत घेऊन ते विजयी झाले आहेत.

त्यांनी राजीनामा द्यायचा नाही आणि हलकटपणांनी वागायचं. राजीनामा देण्याइतपत संजय राऊत यांची लायकी नाही आणि ते राजीनामा देणार पण नाही. उद्धव ठाकरेंनी संजय राऊत यांच्या कानात सांगितलं असेल शांत राहा म्हणून ते तीन मिनिटं बोलले असावेत असा खोचक टोलाही पाटील यांनी राऊतांना लगावला.

ठाकरेंवर राग नाही पण....

उध्दव ठाकरेंनी केलेल्या टीकेवर प्रत्युत्तर देताना पाटील म्हणाले, उद्धव ठाकरे नवं काहीच बोलले नाहीत. कालच्या सभेतील नेत्यांच्या भाषणात कोणतंही व्हिजन नव्हतं. उद्धव ठाकरेंविषयी आम्हाला राग नाही हे आम्ही आधीच सांगितलं होतं. परंतू, ज्यांनी शिवसेना फोडली त्यांच्याविषयी आमच्या मनात राग आहे असंही पाटील म्हणाले.

Gulabrao Patil On Uddhav Thackeray rally
Uddhav Thackeray : अमित शाह, शिंदे, गुलाबराव पासून ते आयोग, आगामी निवडणुका.. ठाकरेंच्या भाषणातील १० ठळक मुद्दे..

ठाकरे काय म्हणाले होते?

उध्दव ठाकरेंनी पाचोरा येथील सभेत भाजप, निवडणूक आयोग, शिंदे गटावर घणाघाती टीका केली. ठाकरे म्हणाले,'या सभेला जमलेली गर्दी पाहिल्यानंतर हे कळतं की शिवसेना कुणाची आहे. पाकिस्तान सुद्धा सांगेल की शिवसेना कुणाची आहे. पण आपल्याकडे मोतीबिंदू झालेल्या निवडणूक आयोगाला हे कळत नाही. मात्र, तो त्यांचा दोष आहे. त्यानंतर काही जणांना वाटलं की ते म्हणजेच शिवसेना.

मग काय म्हणाले की आम्ही सभेत घुसणार?, आम्ही अशा घुसा खूप पाहिल्या आहेत. घुशींना बिळातून बाहेर काढून आपटणार'' असं म्हणत ठाकरेंनी गुलाबराव पाटलांना टोला लगावला.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com