Pratap Patil Chikhlikar : 'नांदेडमध्ये पराभव माझा झाला; पण नाचक्की भाजप अन्‌ अशोक चव्हाणांची झाली...!'

Nanded Lok Sabha Constituency : कार्यकर्त्यांनी थोडी मेहनत घेतली असती तर माझा विजय झाला असता आणि अशोक चव्हाण यांना केंद्रात मंत्रि पदही मिळाले असते. पण, माझा पराभव झाला आणि चव्हाण यांचे मंत्रिपद हुकले.
Pratap Patil Chikhlikar-Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar-Ashok Chavan Sarkarnama

Nanded, 15 June : लोकसभेच्या नांदेड मतदार संघात माझा पराभव झाला असला तरी जिल्ह्यात नाचक्की भाजप आणि माजी मुख्यमंत्री, खासदार अशोक चव्हाण यांची झाली, अशा शब्दांत भाजपचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आपल्या पराभवाचे खापर महायुतीच्या कार्यकर्त्यांवर फोडले. माझ्या पराभवामुळे केंद्रात अशोक चव्हाण यांना मंत्रिपद मिळाले नाही, असेही चिखलीकर म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातील सात मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांचा दारुण पराभव झाला. यामध्ये हमखास निवडून येणाऱ्या लोकसभा मतदारसंघातील यादीत अग्रक्रमाने नाव असलेल्या नांदेडचा (Nanded) समावेश आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या भाजप (BJP) प्रवेशानंतर नांदेड लोकसभेची जागा महायुती (Mahayuti) मोठ्या मताधिक्याने जिंकेल असा, दावा केला जात होता.

मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि अबकी बार 400 पार झाल्यानंतर संविधान बदलले जाणार या प्रचारामुळे महायुतीला विशेषतः भाजपला मराठवाड्यात सर्वाधिक फटका बसला. नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेस महाविकास आघाडीचे वसंत चव्हाण यांनी प्रताप पाटील चिखलीकर यांचा दणदणीत पराभव केला. या पराभवावरून जिल्ह्यात आता भाजपमधील अंतर्गत वातावरण चांगलेच तापले आहे.

माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा संताप आता जिल्ह्यातील आढावा बैठकींमधून बाहेर पडत आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी एक दोघांनी माझे काम केले नाही, त्यांना मी शेवटपर्यंत सोडणार नाही. भाजपने काहींना लायकी नसताना मोठे केले, त्यांना पदे दिली, असा घणाघात केला होता.

Pratap Patil Chikhlikar-Ashok Chavan
Lok Sabah Election Result : ‘वायव्य मुंबई’ निकाल अपडेट; मतमोजणी केंद्रात मोबाईलवर बोलणारी व्यक्ती निघाली वायकरांचा मेहुणा

त्यानंतर आता आपल्या पराभवामुळे नांदेड जिल्ह्यात भाजपची आणि खासदार अशोक चव्हाण यांची नाचक्की झाल्याचे म्हटले आहे. अशोक चव्हाण भाजपमध्ये आल्यानंतर नांदेड लोकसभेची जागा आपण सहजरीत्या जिंकू, या भ्रमात भाजप आणि महायुतीचे कार्यकर्ते राहिले, हा गाफिलपणाच निवडणुकीत नडला. कार्यकर्त्यांनी थोडी मेहनत घेतली असती तर माझा विजय झाला असता आणि अशोक चव्हाण यांना केंद्रात मंत्रि पदही मिळाले असते. पण, माझा पराभव झाला आणि चव्हाण यांचे मंत्रिपद हुकले, असे चिखलीकर यांनी जाहीरपणे सांगितले.

प्रताप पाटील चिखलीकर यांनी आपल्या भाषणात एक-दोन जणांचा उल्लेख केला, यावरून त्यांचा रोख भाजपचे आमदार राजेश पवार आणि डॉ. तुषार राठोड यांच्यावर असल्याचे बोलले जाते. चिखलीकर यांनी त्यांचे थेटपणे नाव घेतले नसले तरी लोकसभेच्या उमेदवारीपासून या दोन आमदारांनी चिखलीकर यांच्या विरोधात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तक्रारी सुरू केल्या होत्या.

प्रताप पाटील चिखलीकर आणि भाजपचे आमदार राजेश पवार आणि डॉ. तुषार राठोड या दोन आमदारांमध्ये सुरुवातीपासूनच मतभेद होते, हे लपून राहिलेले नाही. लोकसभेतील पराभवानंतर हा वाद आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Edited By : Vijay Dudhale

Pratap Patil Chikhlikar-Ashok Chavan
Solapur Politics : सोलापूर राष्ट्रवादीचे कॅप्टन महेश कोठेंच्या मतदारसंघावर काँग्रेसचा डोळा; तुतारीचे वाढले टेन्शन...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com