Lok Sabah Election Result : ‘वायव्य मुंबई’ निकाल अपडेट; मतमोजणी केंद्रात मोबाईलवर बोलणारी व्यक्ती निघाली वायकरांचा मेहुणा

North West Mumbai Lok Sabha Constituency : वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात सुरुवातीला कीर्तिकर यांना विजयी घोषित करण्यात आले होते. मात्र, शिंदे गटाच्या मागणीनुसार घेण्यात आलेल्या फेरमतमोजणीत वायकर यांचा अवघ्या ४८ मतांनी विजय झाला.
Amol Kirtikar-Ravindra Waikar
Amol Kirtikar-Ravindra WaikarSarkarnama

Mumbai, 15 June : लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक चुरशीच्या ठरलेल्या वायव्य मुंबई मतदारसंघासंदर्भात एक महत्वपूर्ण घडामोड पुढे आली आहे. मतमोजणीच्या दिवशी मतमोजणीच्या ठिकाणी एक व्यक्ती मोबाईलवर बोलत असल्याचे आढळून आले होते. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांचे मेहुणे असल्याचे निष्पन्न झाले आहे.

वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या (North West Mumbai Lok Sabha Constituency) मतमोजणी केंद्रात मोबाईलवर बोलणाऱ्या व्यक्तीचे नाव मंगेश पंडीलकर असे आहे. ते रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांचे मेहुणे असल्याचे पुढे आले आहे. तहसीलदारांच्या तक्रारीनंतर पंडीलकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मतमोजणी केंद्रात मोबाईलवर बोलणारी व्यक्ती वायकरांचा मेहुणा निघाल्याने या मतदारसंघातील वाद पेटण्याची चिन्हे आहेत. ठाकरे गट या निकालाच्या विरोधात न्यायालयात जाणार आहे.

वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) आणि शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांच्यात ‘काँटे की टक्कर’ लढाई झाली. त्या निवडणुकीत सुरुवातीला कीर्तिकर यांना विजयी घोषित करण्यात आले होते. मात्र, शिंदे गटाच्या मागणीनुसार घेण्यात आलेल्या फेरमतमोजणीत वायकर यांचा अवघ्या ४८ मतांनी विजय झाला होता. मात्र ठाकरे गट या निकालाच्या विरोधात न्यायालयात जाणार आहे. त्यामुळे वायव्य मुंबईतील निकालाची उत्सुकता कायम राहणार आहे.

मतमोजणी कक्षात मोबाईलवर बोलणारे मंगेश पंडीलकर यांच्या विरोधात या मतदारसंघातून निवडणूक लढवणारे हिंदू समाज पक्षाचे उमेदवार भरत शाह यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. शाह यांची तक्रार दाखल न करता पोलिसांनी तहसीलदारांची तक्रार दाखल करून घेतली आहे. त्यांना या प्रकरणार केवळ साक्षीदार करण्यात आलेले आहे. माझी तक्रार दाखल करून घेण्याऐवजी पोलिसांनी तहसीलदारांची तक्रार दाखल करून घेतली. हे सर्व संशय निर्माण करणारे आहे, असे भरत शाह यांनी म्हटलेले आहे.

Amol Kirtikar-Ravindra Waikar
Solapur Politics : सोलापूर राष्ट्रवादीचे कॅप्टन महेश कोठेंच्या मतदारसंघावर काँग्रेसचा डोळा; तुतारीचे वाढले टेन्शन...

पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतल्यानंतर मंगेश पंडीलकर हे वनराई पोलिस ठाण्याकडे आज सकाळी येत होते. पण, पोलिस ठाण्याच्या आवारात माध्यम प्रतिनिधींना पाहून वायकरांचे मेहुणे पंडीलकर यांनी ठाण्यात न जाताच परत जाणे पसंत केले.

पंडीलकर यांचे मतमोजणी कक्षात मोबाईलवर बोलणे, फेरमतमोजणीत कीर्तिकर यांचा पराभव, शाह यांची तक्रार न नोंदविता पोलिसांनी तहसीलदरांची तक्रार नेांदविणे, पंडीलकर यांनी पोलिस ठाण्यात न येता परत जाणे याबाबत गूढ वाढत चालले आहे. त्यामुळे पोलिस तपासात काय निष्पन्न होते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Amol Kirtikar-Ravindra Waikar
Sunil Tatkare : तटकरेंना काँग्रेसमधील कोणत्या नेत्यांनी लोकसभेला मदत केली? तटकरेंच्या दाव्यानंतर संशयकल्लोळ!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com