Uddhav Thackeray Hingoli Sabha : निवडणुका जिंकण्यासाठी भाजप हिंदू-मुस्लिम दंगली घडवू शकते ; उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप

Hindu- Muslim Riots : उद्धव ठकरेंनी आज हिंगोलीत सभा घेतली. यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sarkarnama

Hingoli Politics : २०२३ मध्ये निवडणुका जिंकण्यासाठी केंद्रातील मोदी सरकार देशात दंगली घडवू शकते, याकडे लक्ष द्या. राममंदिरांच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने देशभरातून हिंदू लोकांना आमंत्रित केलं जाणार आहे. पण हा सोहळा झाल्यानंतर हिंदू घरी परतताना एखाद्या मुस्लिम भागात हिंदू-मुस्लिमांमध्ये दंगली घडवून आणल्या जाऊ शकतात, अशी शंका उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. ते हिंगोलीत आयोजित सभेत बोलत होते. तसेच, हा मोदींविरोधातला लढा नाही, लोकशाहीचा लढा आहे. आम्ही लोकशाही टिकवण्यासाठी पुढे आलो आहोत. असंही त्यांनी नमुद केलं आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, 'चांद्रयान मोहिमेचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो. २०२३ पर्यंत मी तुम्हाला चंद्रावर घरे देईल, असं सांगून तुमची दिशाभूल केली जाऊ शकते. या विचारातून तुम्ही त्यांना मते तर द्याल पण, चंद्र राहतो दुर आणि शेतातलं घर गहाण टाकावं लागू शकते.

दुसरी गोष्ट म्हणजे, पश्चिम बंगालच्या खासदार आणि जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी खुलेआम सांगितलंय की, २०१९ मध्ये जो पुलवामा हल्ला झाला, तो यांचाच(भाजप) कट आहे. निवडणुका जिंकण्यासाठी हा कट केला. सत्तेसाठी हे कोणत्याही थराला जाऊ शकतात, असही उद्धव ठाकरेंनी नमुद केलं.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Hingoli Sabha : दादांचे बोट धरून भाजपमध्ये गेले अन् ईडी हसन मुश्रीफांचे घर विसरली ; ठाकरेंनी डिवचले

यांनी बाबरी मस्जिद पाडली नाही, राममंदिराचा निर्णयही सर्वोच्च न्यायालयाने दिला. काही निधी सरकारकडून मिळत आहे. येत्या १ जानेवारीला राममंदिर उभारण्याचा सोहळा होणार आहे.त्यासाठी ते देशभरातून हिंदुंना आमंत्रित करतील, बस, ट्रेनभरून भाविक येतील. सोहळ्यानंतर भाविक परत जाताना एखाद्या मुस्लिम वस्तीच्या ठिकाणी किंवा एखाद्या जागी गाड्यांवर दगडफेक करून देशात हिंदू-मुस्लिम दंगली पेटवल्या जातील, अशी शंका सत्यपाल मलिक आणि खासदार महुआ मोईत्रा यांनी व्यक्त केली आहे.

पु्न्हा तेच, गोरगरिबांच्या घराचा सत्यानाश, राखरांगोळी होणार, गोरगरिबांच्या घरावर वरवंटा फिरवून हे सत्तेवर बसणार, या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. याकडेही त्यांनी लक्ष वेधलं आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com