Parbhani BJP Political News : भाजप जिल्हाध्यक्षावर लैंगिक अत्याचाराचा आरोप; मुरकुटे म्हणतात हे गुट्टेंचेच षडयंत्र...

BJP News : मी प्रतिस्पर्धी असल्याने आमदार गुट्टे यांनीच आपल्या विरोधात संबंधित महिलेला फिर्याद द्यायला लावली.
Parbhani BJP Political News
Parbhani BJP Political NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada Political News : परभणी जिल्ह्यातील भाजप आणि मित्रपक्ष असलेल्या रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यातील राजकीय वैमनस्य गंभीर वळण घेत आहे. (BJP News) भाजपचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) संतोष मुरकुटे यांनी नोकरीचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार दाखल करण्यात आी आहे. यावर हे सर्व षडयंत्र भाजपचे मित्रपक्ष असलेल्या रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचेच असल्याचा आरोप संतोष मुरकुटे यांनी रविवारी (दि. २२) पत्रकार परिषदेत केला.

Parbhani BJP Political News
Abdul Sattar News : मुख्यमंत्र्यांच्या दसरा मेळाव्यासाठी सत्तारांनी बुक केल्या दोनशे बस..

संबंधित महिलेने रविवार, दि. २२ रोजी (Parbhani) परभणीच्या जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे भाजपचे जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे यांच्या विरोधात लैंगिक अत्याचाराची तक्रार दिली. मी कल्याण (जिल्हा ठाणे) येथे राहत असून, व्यवसायाने कंत्राटदार असलेल्या मुरकुटे यांच्याशी २०१८ मध्ये आपली ओळख झाली होती. (BJP) नोकरी लावून भविष्यात लग्न करतो, असे अमिष दाखवून आपल्याशी मुरकुटे यांनी संबंध ठेवले.

१५ जुलै २०२३ रोजी नौपाडा, ठाणे (पश्चिम) पोलिस ठाण्यात मुरकुटे यांच्याविरुद्ध सर्वप्रथम तक्रार दिल्याचे या महिलने तक्रारीत नमूद केले आहे. या आरोपानंतर संतोष मुरकुटे यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप निराधार असल्याचे सांगितले. यामागे गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे (Ratnakar Gutte) यांचे षडयंंत्र असून, त्यांनीच आपल्याला कौटुंंबिक व राजकीय जीवनातून उठवण्यासाठी हे षडयंत्र रचल्याचा आरोप मुरकुटे यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गुट्टे यांना मला भाजपचे जिल्हाध्यक्ष होऊ द्यायचे नव्हते. तसेच भविष्यात विधानसभेचे उमेदवार म्हणून आपण त्यांचे प्रतिस्पर्धी असल्याने आमदार गुट्टे यांनीच आपल्या विरोधात संबंधित महिलेला फिर्याद द्यायला लावली, असा दावा मुरकुटे यांनी केला. दरम्यान, या आरोप- प्रत्यारोपाने महायुतीतील मतभेद उघड झाले आहेत. रत्नाकर गुट्टे हे भारतीय जनता पक्षाचे आमदार असल्यासारखे सार्वजनिक जीवनात वावरत असतात.

परभणी येथे येणाऱ्या भाजपच्या प्रत्येक नेत्याच्या दौऱ्यात रत्नाकर गुट्टे हे कायम सोबत असतात. गंगाखेड मतदारसंघाच्या विविध विकासकामांबाबत ते केंद्रीय मंत्री, राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या नेहमीच संपर्कात असतात. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत रत्नाकर गुट्टे हे भाजपसोबत असतील किंवा त्यांच्या उमेदवारीसाठी भाजप मित्रपक्षाला आग्रह धरतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता.

Parbhani BJP Political News
MP Omprakash Raje Nimbalkar News : तुळजाभवानीच्या दर्शनाची ओढ, खासदार ओमराजे २१ किलोमीटर धावले..

तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) संतोष मुरकुटे हे गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील असल्याने भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी ते प्रबळ दावेदार मानले जातात. गुट्टे यांना तुल्यबळ उमेदवार असल्याने संतोष मुरकुटे आणि गुट्टे यांच्यात राजकीय वैमनस्य निर्माण झाल्याचे उघड झाले.

मध्यंतरी चंद्रशेखर बावनकुळे यांचा जिल्ह्यात दौरा झाला होता, तेव्हाही त्यांनी गुट्टे यांना झुकते चामाप देत गुट्टे हे भाजपचे उमेदवार असतील आणि संतोष मुरकुटे त्यांचा प्रचार करतील, असे म्हटले होते. परंतु गुट्टे आणि मुरकुटे यांच्यात दिलजमाई होण्याची कुठलेही चिन्हं सध्या तरी दिसत नाहीत.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com