MP Omprakash Raje Nimbalkar News : तुळजाभवानीच्या दर्शनाची ओढ, खासदार ओमराजे २१ किलोमीटर धावले..

Marathwada Political News : धावत जाऊन त्यांनी तुळजाभवानीचे तसेच येडेश्वरी देवीचे दर्शन घेतले.
Mp Omprakash Raje Nimbalkar News
Mp Omprakash Raje Nimbalkar NewsSarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News : नवरात्रोत्सवात सर्वसामान्य भाविकांचा उत्साह शिगेला पोहचला आहे. जगदंबेची उपासना, व्रत, वैकल्य आणि गरबा अशा विविध माध्यमातून स्त्री शक्तीचा जागर राज्यभरात मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. (Shivsena News) राजकारणीही यात मागे नाहीत, सर्वच पक्षाच्या नेते, लोकप्रतिनिधींनी आपापल्या भागात नवरात्रोत्सवा निमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.

Mp Omprakash Raje Nimbalkar News
Maratha Reservation News : आधी मराठा आरक्षण, मग पक्ष ; नांदेडमध्ये भाजप पदाधिकारी आक्रमक..

धाराशिवचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर हे तर चक्क तुळजाभवानी मातेच्या ओढीने तब्बल २१ किलोमीटर धावून दर्शनाला गेले. (Omraje Nimbalkar) ओमराजे निंबाळकर हे आपल्या फिटनेससाठी राज्यभरात ओळखले जातात. नियमित व्यायाम, योग्य आहार, योगा यातून ओमराजे यांनी सृदृढ शरीरयष्टी कमावली आहे. (Shivsena) घोडेस्वारी, नियमित व्यायाम हा त्यांचा छंद गेल्या अनेक वर्षापासून ते जापासत आहेत.

नवरात्रोत्सवा निमित्त तुळजापूरच्या भवानी मातेच्या दर्शनासाठी राज्यासह देशभरातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात. (Marathwada) आज अष्टमीच्या मुहूर्तावर खासदार ओमराजे निंबाळकर आपल्या काही सहकाऱ्यांसोबत धाराशिव ते तुळजापूरपर्यंत चक्क धावत गेले. २१ किलोमीटरचे अंतर पळत जाऊन त्यांनी पार केले आणि तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या तुळजाभवानीला अनेक भाविक नवस बोलतात. तो पुर्ण झाला की त्याची फेड करण्यासाठी पायी, लोटांगण घालत किंवा गुढघ्यावर चालत भाविक नवस पुर्ण करतात. ओमराजे निंबाळकर यांनी असा कुठला नवस बोलला नसला तरी धावत जाऊन त्यांनी तुळजाभवानीचे तसेच येडेश्वरी देवीचे दर्शन घेतले. त्यांच्या या धाडसाबद्दल मतदारसंघात कौतुक आणि चर्चाही होत आहे.

ओमराजे पहाटेच धाराशिवहून तुळजापूरकडे निघाले होते. २१ किलोमीटरचे हे अंतर १ तास ५९ मिनिटांत त्यांनी पुर्ण केले. धाराशिव जिल्ह्यात दरवर्षी मॅरेथाॅनचे आयोजन केले जाते. ओमराजे यात दरवर्षी सहभागी होतात. या मॅरेथाॅनच्या पुर्वतयारीचा भाग म्हणून धाराशिव ते तुळजापूर २१ किलोमीटरचा हा राऊंड आयोजित करण्यात आला होता. पुढील महिन्यात ही मॅरेथाॅन स्पर्धा होणार आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com