Shivsena Maharashtra News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी राज्यभरात सुरू आहे. (Shivsena News) उद्धव ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्यापेक्षा जास्त गर्दी जमवून शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न या निमित्ताने शिंदे गटाकडून केला जाणार आहे. यासाठी राज्यभरातून शिवसैनिक व सर्वसामान्यांना मुंबईत घेऊन जाण्याची जबाबदारी अनेक मंत्र्यांवर सोपवण्यात आली आहे.
राज्याचे पणन व अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी शिंदेच्या दसरा मेळाव्यासाठी सिल्लोड-सोयगांव मतदारसंघातून २५ हजार नागरिकांना नेण्याचे उदिष्ट ठेवले आहे. त्यासाठी अब्दुल सत्तार यांनी तब्बल दोनशे बस बुक केल्या आहेत. (Marathwada) पैकी दीडशे बसेस या छत्रपती संभाजीनगर तर पन्नास जालना डेपोतून दिल्या जाणार आहेत.
या बसेसच्या भाड्यापोटी अब्दुल सत्तार यांनी प्रासंगिक करारअंतर्गत ५५ रुपये प्रति किलोमीटर प्रमाणे दोनशे बसेसचे पैसे मुंबई सेंट्रल येथील एसटी मुख्यालयात भरले आहेत, अशी माहिती विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर यांनी `सरकारनामा`शी बोलतांना दिली. (Eknath Shinde) उद्या दूपारपासून या बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या शिवाय गावागावांत खासगी वाहनांची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड तालुक्यातील भराडी, देऊळगाव बाजार, बोरगाव सारवणी, बोरगाव बाजार, आमठाणा, अंभई आदी गावांत भेटी देऊन गावकऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत मुंबई येथे दसरा मेळाव्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले. शिंदे यांनी सर्वसामान्य जनता, शेतकरी शेतमजुरांना न्याय देत, गतीमान पध्दतीने विकास कामे केली. त्यामुळे एक लोकप्रिय व कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची ओळख असल्याचे सत्तार यांनी या बैठकीत सांगितले. शिंदे यांना साथ देण्यासाठी मोठ्या संख्येने मुंबईत जाण्यासाठी तयार राहा, असे आवाहनही सत्तार यांनी यावेळी केले.
गेल्यावर्षीही सत्तार यांनी सिल्लोड-सोयगांव मतदारसंघातू हजारो नागरिकांना मुंबईची सफर घडवली होती. आझाद मैदानावर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी उद्या, दि.२३ रोजी सायंकाळपासूनच बसेस मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात येणार आहे. दसरा मेळाव्याला जाणाऱ्या नागरिकांनी अब्दुल सत्तार यांच्यावतीने चहा, पाणी, जेवणाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. यंदाही दसरा मेळाव्यात अब्दुल सत्तार सिल्लोड-सोयगांव मतदारसंघातील आपली ताकद दाखवणार आहेत. इतर कुठल्याही मतदारसंघा पेक्षा आपल्या मतदारसंघातून सर्वाधिक लोक मुंबईत दसरा मेळाव्याला येतील, असा शब्द सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांना दिल्याचे बोलले जाते.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.