Municipal Corporation News : महापालिकेसाठी भाजपाची रणनिती तयार, महापौर करण्यासाठी संभाजीनगरातील तीस प्रभाग टार्गेट!

BJP is targeting the mayor's post in the upcoming Sambhajinagar municipal elections, with a strategic focus on 30 important wards in the city. : मागील लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपाला मतदारांचा चांगला पाठिंबा राहिला आहे. मागील निवडणुकींच्या तुलनेत यावेळी पक्षाला होणारे मतदान वाढले आहे.
Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation News.
Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation News.Sarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला तशी राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सत्तेसह महापौर करण्यासाठी भाजपाने रणनिती आखली आहे. आतापर्यंत शिवसेना-भाजप युतीमध्ये पंचवीस वर्षात भाजपच्या वाट्याला कवेळ तीनवेळा महापौर पद आले होते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर येणाऱ्या निवडणुकीत भाजपाला आपला महापौर बसवण्याची संधी चालून आली आहे. शिंदेसेना सोबत असली तरी त्यांच्यापेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणत महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकवण्याचे स्थानिक नेत्यांचे स्वप्न आहे.

यासाठी भाजपाला (BJP) अनुकूल अशा तीस प्रभागांवर पक्षाकडून लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. कुठल्याही परिस्थितीत या प्रभागातून उमेदवार निवडून आला पाहिजे, या दृष्टीने पक्षाकडून तयारी सुरू झाली आहे. घटनपर्व अंतर्गत शहरात दीड लाखांवर सदस्य नोंदणी करण्यात आली आहे. तसेच तीस प्रभागांत वातावरण पक्षासाठी अनुकूल असल्याने येथून निवडणुका लढवण्याचे निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे.

मागील लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपाला मतदारांचा चांगला पाठिंबा राहिला आहे. मागील निवडणुकींच्या तुलनेत यावेळी पक्षाला होणारे मतदान वाढले आहे. त्यात मागील काही दिवसांपासून संघटनपर्व अंतर्गत आम्ही जोरदार काम केले. (Municipal Corporation News) यात शहरातील पूर्व, मध्य आणि पश्चिम विधानसभा मतदारसंघात अशी एकूण 1 लाख 65 हजार सदस्य नोंदणी झालेली आहे.

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation News.
BJP Politics : आता भाजपची बारी ; एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे दोघांना धक्का देण्याची तयारी?

दुसरीकडे दीड हजार सक्रिय सदस्य झाले आहेत. नुकत्याच मंडळ अध्यक्षांच्या नियुक्त्या देखील केल्या आहेत. यामुळे निवडणूक केव्हाही जाहीर झाली तरी तयार असल्याचे भाजपाचे नेते सांगतात. पक्षाची ताकद वाढल्याने महापालिकेच्या निवडणुका भाजपाने स्वबळावर लढाव्या, अशी पदाधिकारी कार्यकर्त्यांची भावना आहे. परंतु, पक्षातील काही वरिष्ठ नेतेच युतीची भाषा करीत आहेत. त्यामुळे या निवडणुका स्वबळावर होणार की युतीत?याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे.

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation News.
Chhatrapati Sambhajinagar Water Issue : शहराशी जिव्हाळा नसलेल्या बाहेरच्या पालकमंत्र्यांनीही पाणी प्रश्नाकडे केले दुर्लक्ष!

महापालिका निवडणुकीसाठी आम्ही तयार आहोत. त्यादृष्टीने सदस्य नोंदणी झालेली आहे. सक्रिय सदस्यही केलेले आहेत. ही निवडणूक स्वबळावर लढावी, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. ती पक्ष श्रेष्ठींकडे कळवू. त्यानंतर निवडणूक स्वबळावर लढवायची की युतीत? याचा अंतिम निर्णय आमचे राज्य स्तरावरील नेते घेतील. त्यांचा निर्णय आम्हाला मान्य असले, असे विद्यमान शहराध्यक्ष शिरीश बोराळकर यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com