
Mumbai, 29 November : दिल्लीतील महायुतीच्या बैठकीत मुख्यमंत्रिपद कोणाकडे जाणार, हे निश्चित झाल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महत्वाची खाती पदरात पाडून घेण्यासाठी महायुतीमधील नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. दुसरीकडे, वजनदार खाती मिळावीत, यासाठी मुंबईत लॉबिंग सुरू झाले आहे. महायुतीमधील तीन पक्षांना कोणती खाती मिळणार, याची संभाव्य यादी पुढे आली आहे.
महायुतीमध्ये (Mahayuti) सर्वाधिक 134 जागा जिंकणाऱ्या भारतीय जनता पक्षाकडे मुख्यमंत्रिपद जाणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. एकनाथ शिंदे यांनीही मुख्यमंत्रिपद सोडणार असल्याचे संकेत दिले आहेत. भाजपकडून एकनाथ शिंदे यांना केंद्रात मंत्रिपद किंवा उपमुख्यमंत्री देण्याचा शब्द देण्यात आलेला आहे. शिंदे यांनी केंद्रात जाण्यापेक्षा राज्यात राहणेच पसंत केले आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे हे राज्यात उपमुख्यमंत्री होतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, मुख्यमंत्रिपद सोडणाऱ्या शिवसेनेने (Shivsena) गृहमंत्रिपदावर दावा केलेला आहे. त्याशिवाय उद्योग, सार्वजनिक बांधकाम, शिक्षण, नगरविकास, आरोग्य, सांस्कृतिक, परिवहन, राज्य उत्पादन शुल्क ही मंत्रिपदे मिळावीत, अशी मागणी दिल्लीत बैठकीत केल्याची माहिती आहे. यातील कोणती खाती शिवसेनेला मिळतात, याकडे राज्याचे लक्ष असणार आहे.
भाजपने गृहमंत्रिपद सोडण्यास नकार दिला आहे. त्याचबरोबर ग्रामविकास, महसूल, सामान्य प्रशासन, गृहनिर्माण, ऊर्जा, जलसंपदा, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम ही मंत्रिपदेही स्वतःकडेच राहावीत, अशी रणनीती आखली आहे. त्यामुळे भाजप शिवसेनेला कोणती मंत्रिपदे देणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मागील टर्ममधील मिळालेली खाती पुन्हा मिळावीत, यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून स्ट्रॅटेजी आखली जात आहे. त्यानुसार अर्थ, महिला व बालकल्याण, अल्पसंख्याक विकास, वैद्यकीय शिक्षण, मदत व पुनर्वसन, अन्न व नागरी पुरवठा, आदिवासी विकास या मंत्रालयांसाठी राष्ट्रवादीने फिल्डिंग लावली आहे.
राज्यातील आमदारांनीही महत्वाची खाती पदरात पाडून घेण्यासाठी लॉबिंग सुरू केले आहे. त्यामुळे अनेक आमदार आणि नेतेमंडळी वरिष्ठांची भेट घेण्यासाठी मुंबईत येत आहे. या आमदारांकडून महत्त्वाच्या मंत्रिपदासाठी मर्जीतील नेत्यांकडून फिल्डिंग सुरू केली आहे. मुख्यमंत्रिपद सोडून इतर मंत्रिपदं मिळावीत, यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.