गेवराई : गेल्या दोन दिवसांपुर्वी झालेल्या पावसामुळे पुल ओलांडत असतांना एक तरूण पाण्यात वाहून गेल्याची घटना तालुक्यातील भोजगावात घडली. याच ठिकाणी बुधवारी जिल्हाधीकारी राधाबिनोद शर्मा यांनी भेट दिली व मयताच्या पत्नीला शासनाच्या मदतीचा चार लाख रुपयांचा धनादेश दिला.
दरम्यान, रस्ता नसल्याने जिल्हाधिकारी ट्रॅक्टच्या ट्रॉलित बसून भोजगावात पोहचले. यापूर्वीही अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी शर्मा यांनी तालुक्यात चिखल तुडवला होता. सुदर्शन संदिपान संत (वय ३४ वर्ष, रा. भोजगाव) हा तरूण रस्ता ओलांडताना अमृता नदीच्या पुलावरुन पाय घसरुन पडल्याने वाहून गेला होता.
यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. दोन वर्षापासुन अमृता नदीवरील या ठिकाणचा पुल अर्धवट आहे. त्यातूनच हि दुर्घटना घडल्याने गावकऱ्यांनी धोंडराईच्या राष्ट्रीय महामार्गावर मृतदेह ठेऊन चार तास ठिय्या अंदोलन केले होते.
दरम्यान, बुधवारी जिल्हाधीकारी राधाबिनोद शर्मा यांनी भोजगावला भेट दिली. गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच मयताच्या पत्नीला चार लाखांचा धनादेश देऊन त्यांच्याशीही संवाद साधला. या कुटुंबाला धीर देतांनाच संबंधीत पुलाचे काम लवकर पुर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.