BJP Health Camp : `देवेंद्र सप्ताह` अंतर्गत आरोग्य शिबिरात सव्वादोन लाख घरात तपासणी..

Aurangabad News :`देवेंद्र सप्ताह` असा उल्लेख असलेले बॅनर शहरात ठिकठिकाणी भाजपच्या वतीने लावण्यात आले आहेत.
BJP Health Camp
BJP Health Camp Sarkarnama
Published on
Updated on

Marathwada News : राजकीय नेते, मंत्री, आमदार, खासदार यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन ही आता नवीन गोष्ट राहिलेली नाही. एक विधायक उपक्रम म्हणून त्याकडे पाहिले जाते. (BJP Health Camp) सामाजिक बांधिलकी यातून जपत असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न देखील यातून राजकीय मंडळी करत असतात. भाजपच्या वतीने १ ते १३ ऑगस्ट दरम्यान, तीन टप्यात हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

BJP Health Camp
High Court : खंडपीठाच्या दणक्यानंतर सरकार नरमले, विकासकामांवरील स्थगिती उठवली..

रेल्वेस्टेशन रोडवरील आयोध्यानगरीच्या मैदानात १३ रोजी या आरोग्य शिबिराचा समारोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. (Devendra fadanvis) फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्तच या आरोग्य शिबिराचे आयोजन ` देवेंद्र सप्ताह`, अंतर्गत करण्यात आल्याचे बोलले जाते. (BJP) महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, घाटी रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालयासह आरोग्य यंत्रणेमार्फत हे महाआरोग्य शिबिर आयोजित आले आहे.

`देवेंद्र सप्ताह` असा उल्लेख असलेले बॅनर शहरात ठिकठिकाणी भाजपच्या वतीने लावण्यात आले आहेत. (Aurangabad) महापालिका, आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनातर्फे शहरातील सुमारे सव्वादोन लाख घरात जाऊन प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी करण्यात आली. एक ते १३ ऑगस्ट दरम्यान आरोग्य तपासणी केल्यानंतर ज्यांना पुढील उपचाराची गरज आहे, अशा रुग्णांवर १३ ऑगस्टला आयोजित महाआरोग्य शिबिरात उपचार करण्यात येतील.

ही आरोग्य तपासणी शासनाच्या आदेशानुसार होत आहे हे विशेष. भाजपसाठी हे महाआरोग्य शिबिर असल्याचे प्रशासनाने यापूर्वी का लपवले ? असा प्रश्‍न या निमित्ताने आता उपस्थित केला जात आहे. घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यासाठी एक हजार जणांची टीम तयार करण्यात आली. शहरातील सरकारी, खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची त्यासाठी मदत घेण्यात आली.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com