Dr.Bhagwat Karad News : संभाजीनगर भाजपात गटबाजी; शहराध्यक्ष पदाच्या निवडीवरून डाॅक्टर कराडांची 'तिरछी चाल'!

Internal rift in BJP intensifies as MP Bhagwat Karad opposes current city president Boralkar : शहराध्यक्षपदाची माळ गळ्यात पडणार नाही, असे ज्यांना वाटते त्यांनीही आता बोराळकर यांच्या नावाला विरोध सुरू केला आहे. अचानक डाॅक्टरांनी पावित्रा बदलल्यामुळे बोराळकर यांची खुर्ची धोक्यात आली आहे.
Dr.Bhagwat Karad BJP News
Dr.Bhagwat Karad BJP NewsSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : भाजपाच्या संघटनात्मक रचनेत आपल्या समर्थकांची वर्णी लावण्यासाठी मोठी स्पर्धा असते. मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात स्थानिक नेत्यांकडून संघटनेवर आपली पकड राहावी यासाठी प्रयत्न सुरू आहे. नांदेडमध्ये खासदार अशोक चव्हाण, परभणीत मंत्री मेघना बोर्डीकर, लातूरमध्ये निलंगेकर- पवार-कराड या तिघांनी प्रयत्न केले तर बीडमध्ये मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस यांच्यामधील संघर्षामुळे संघटनात्मक नियुक्त्या रखडल्या आहेत.

इकडे मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड, (Dr.Bhagwat Karad) राज्यातील मंत्री अतुल सावे, नवनिर्वाचित आमदार संजय केनेकर या तीघांमध्ये शहराध्यक्ष पदाच्या निवडीवरून स्पर्धा सुरू आहे. कराड यांना चिरंजीव हर्षवर्धन कराड याला शहराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसवायचे होते. पण एका घरात दोन पदे देता येणार नाही, असे स्पष्ट करत मुख्यमंत्र्यांनी नकार घंटा वाजवली. आता मुख्यमंत्र्यांच्या शब्दाबाहेर जाता येत नाही म्हटल्यावर कराडांनी मुलाच्या नावाचा आग्रह सोडला.

पण फडणवीसांचे लाडके असलेले विद्यमान शहराध्यक्ष शिरीष बोराळकर याना बदलण्याची मागणी मात्र लावून धरली. डाॅक्टरांच्या या 'तिरछी चाल'मुळे इच्छुकांना मात्र आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत. (BJP) पक्षात नव्या लोकांना संधी मिळाली पाहिजे असा उद्दात हेतू पुढे करत डाॅक्टरांनी काही न बोलता आॅपरेशन केल्याची चर्चा या निमित्ताने जिल्ह्याच्या राजकारणात सुरू आहे. सावे-कराड यांचे चांगले जुळत असले तरी शहराध्यक्ष पदाच्या निवडीवरून दोघांमध्ये मतभेद असल्याचे दिसून आले आहे.

Dr.Bhagwat Karad BJP News
Dr.Bhagwat karad : फायनान्स मिनिस्टर म्हणून खूप काम केले, मला कॅबिनेटची आशा होती! खासदार कराडांनी व्यक्त केली खंत

आगामी महापालिका निवडणुका पाहता विद्यमान शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांना पुन्हा संधी देण्यात यावी, असा एक मतप्रवाह आहे. बोराळकर यांची कारकीर्द फार चांगली होती असे नाही, परंतु वाईटही नव्हती. आता राज्यात महायुतीचे सरकार आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असल्याने बोराळकर यांना संघटनात्मक बळ मिळेल आणि महापालिकेत भाजपा नंबर एकचा पक्ष ठरू शकेल, अशी आशा स्थानिक नेते बाळगून आहेत. कराड यांनी मात्र माझा मुलगा नाही, तर मग बोराळकरही नको, नवा चेहरा द्या, असा सूर लावला आहे.

Dr.Bhagwat Karad BJP News
Bhagwat Karad On Water Issue : हो.. महापालिकेच्या सत्तेत आम्हीही, पण रिमोट कंट्रोल खैरेंचा म्हणून पाणी प्रश्नाला तेच जबाबदार!

शहराध्यक्षपदाची माळ आपल्या गळ्यात पडणार नाही, असे ज्यांना वाटते त्यांनीही आता बोराळकर यांच्या नावाला विरोध सुरू केला आहे. वातवरण आपल्या बाजूने असताना अचानक डाॅक्टरांनी पावित्रा बदलला त्यामुळे बोराळकर यांची खुर्ची धोक्यात आल्याची चर्चा आहे. बोराळकरांच्या नावाला विरोध दर्शवत कराड यांनी वादाची ठिणगी टाकली आहे, आता त्याचा वणवा पेटतो का? हे येत्या 48 तासात स्पष्ट होईल.

Dr.Bhagwat Karad BJP News
BJP Politics : आता भाजपची बारी ; एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे दोघांना धक्का देण्याची तयारी?

शहराध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू आहे. शहरातील 23 पदाधिकाऱ्यांकडून त्यांची मते जाणून घेण्यात आली. यात वीस पदाधिकाऱ्यांनी आपली मते नोंदवली. पण किती दिवस डॉ. कराड, सावे, आमदार संजय केणेकर, शिरीष बोराळकर यांच्यासारख्या चेहऱ्यांना संधी द्यायची, पक्षात नवीन नेतृत्व समोर यायला हवे. यामुळे शहराध्यक्ष निवडताना नवीन, युवा दमाच्या नेतृत्वाला संधी द्यायला हवी, अशी भूमिका कराड यांनी घेतली.

Dr.Bhagwat Karad BJP News
Atul Save On Water Isuee : पाणी गळ्याशी आले, सावे-कराड यांनी घेतली गुपचूप बैठक!

शेवटी अध्यक्ष कोण करायचा हे पक्षश्रेष्ठीच ठरवतील, असे सांगत कराड यांनी सेफ गेम खेळला आहे. दुसरीकडे बोराळकर यांची शहराध्यक्षपद स्वीकारण्याची इच्छा नसल्याचे बोलले जाते. परंतु त्यांनाच पुन्हा संधी मिळावी यासाठी ओबीसी विकास मंत्री अतुल सावे प्रयत्नशील आहेत. एकूणच शहराध्यक्ष पदावरून भाजपात दोन गट पडल्याचे चित्र आहे. काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी मिळायलाच हवी. सर्वानुमते ज्यांच्या बाजूने अधिक मते होती, त्यांनाच मंडळ अध्यक्ष म्हणून संधी मिळाली, असे सांगत कराड यांनी आपली भूमिका कशी योग्य आहे हे पटवून देण्याचाही प्रयत्न केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com