Chandrakant Khaire Meet Uddhav Thackeray : पक्ष संकटात असताना वाद नको, म्हणून मी चार पाऊलं मागे! उद्धव ठाकरेंना त्रास होऊ देणार नाही..

Uddhav Thackeray advises Khaire and Danve to avoid internal disputes during Shiv Sena’s ongoing political crisis. Tensions rise within the party. : मी शिवसेनेतील जेष्ठ नेता आहे, माझा अंबादास दानवे यांच्याकडून वारंवार अपमान केला जातो. परस्पर संघटनेसंदर्भतील निर्णय घेतले जातात, हे मी साहेबांच्या कानावर घातले. हे योग्य नसल्याचे त्यांनीही मान्य केले.
Chandrakant Khaire, Uddhav Thackeray News
Chandrakant Khaire, Uddhav Thackeray NewsSarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT News : शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी पक्षातील दुसरे नेते अंबादास दानवे यांच्यावर गंभीर आरोप करत आज मातोश्रीवर धाव घेतली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन दानवे यांना योग्य समज द्यावी, माझ्यासारख्या जेष्ठ नेत्याचा अपमान यापुढे होऊ नये हे त्यांना सांगा, तुम्हाला त्रास होईल, पक्ष आणखी संकटात सापडेल, असे कृत्य माझ्याकडून होणार नाही, असा शब्द मी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

साहेबांनीही पक्षात तुमचा योग्य सन्मान, मान राखलाच जाईल, याबद्दल मी अंबादास दानवे यांना सूचना दिल्या आहेत, असे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सांगितले आहे. पक्ष संकटात असताना वाद नको, असे त्यांनी मला सांगितले. मी ही त्यांना त्रास नको, म्हणून चार पाऊलं मागे घेण्याची भूमिका घेतली असल्याचे चंद्रकांत खैरे यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.

छत्रपती संभाजीनगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील अंतर्गत गटबाजी सध्या उफाळून आली आहे. (Chandrakant Khaire) खैरे-दानवे यांच्यातील वादाची याला किनार असून कार्यकर्ता मेळाव्याबद्दल आपल्याला काहीच माहिती दिली नाही, असा आरोप करत चंद्रकांत खैरे यांनी काल माध्यमांशी बोलताना शिवसेना नेते अंबादास दानवे यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

Chandrakant Khaire, Uddhav Thackeray News
Sanjay Shirsat On Chandrakant Khaire : मातोश्री तुमचं ऐकणार नाही, खैरेंना एक दिवस अंबादास दानवेंचे जोडे उचलावे लागतील!

ते काड्या करतात, मी शिवसेना वाढवली, हे आता आले. तो मोठा नेता झालाय, मला विचारत नाही, कार्यक्रमाला बोलवत नाही, परस्पर निर्णय घेतो. त्याच्यामुळे पक्षातील अनेक लोक निघून गेले यासह अनेक गंभीर आरोप खैरे यांनी केले होते. याचे राजकीय पडसादही जिल्ह्याच्या राजकारणात उमटू लागले होते. खैरे यांना शिंदेसेनेकडून आॅफर दिल्या जात आहेत. तर दानवे यांनी खैरे यांच्या वादावर फारसे भाष्य न करण्याची नेहमीची भूमिका कायम ठेवली.

Chandrakant Khaire, Uddhav Thackeray News
Ambadas Danve On Sandipan Bhumre : तुम्ही गावाला पाणी देऊ शकत नाहीत, छत्रपती संभाजीनगरचा विषय तुमच्या आवाक्याबाहेर! दानवेंनी खासदार भुमरेंना फटकारले

खैरेंनी आपण उद्धव ठाकरे यांच्याकडे दानवेंची तक्रार करणार असल्याचे माध्यमांना सांगितले. त्यानूसार आज दुपारी तीनच्या सुमारास खैरे यांची उद्धव ठाकरे यांची भेट झाली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याबद्दल विचारले असता, खैरे म्हणाले, मी शिवसेनेतील जेष्ठ नेता आहे, माझा अंबादास दानवे यांच्याकडून वारंवार अपमान केला जातो. परस्पर संघटनेसंदर्भतील निर्णय घेतले जातात, हे मी साहेबांच्या कानावर घातले. हे योग्य नसल्याचे त्यांनीही मान्य केले.

Chandrakant Khaire, Uddhav Thackeray News
Chandrakant Khaire On Ambadas Danve : आम्ही पक्षासाठी जेलमध्ये गेलो, लाठ्या-काठ्या खाल्ल्या, अंबादास दानवे आला अन् काड्या करतो! चंद्रकांत खैरेंचा पारा चढला

परंतु सध्याची राजकीय परिस्थिती आणि पक्ष संकटात असताना तुमच्यातील वाद आणि ते जाहीरपणे होणे योग्य नसल्याचे उद्धवसाहेब म्हणाले. खैरेजी तुमचा पक्षात योग्य सन्मान केला जाईल, या संदर्भात मी कालच अंबादास दानवे यांना बोललो आहे. त्यामुळे तुम्ही आपापसातील वाद आता मिटवा आणि सोबत मिळून पक्षाचे काम करा, अशा सूचना उद्धवसाहेबांनी आम्हाला दिल्या आहेत. उद्धवसाहेबांना त्रास होऊ नये, यासाठी मी चार पाऊलं मागे येण्याची भूमिका घेतली आहे. अंबादास दानवेही ती घेतील, अशी अपेक्षा असल्याचे खैरे म्हणाले.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com