Nanded Lok Sabha Exit Poll 2024 : अशोक चव्हाणांच्या नांदेडमध्ये चिखलीकर 'सेफ'च

Ashok Chavan and Pratap Chikhlikar lok Sabha Election Exit Poll : काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपसोबत आल्याचा फायदा प्रताप पाटील-चिखलीकर यांना झाला आहे. 'पोल ऑफ पोल'ने वर्तवलेल्या अंदाजानुसार चिखलीकर यांना आघाडी मिळण्याची शक्यता वर्तवली आहे.
Ashok chavan, Pratap Chikhlikar
Ashok chavan, Pratap ChikhlikarSarakrnama
Published on
Updated on

Exit Poll 2024 : लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली उभी फूट त्यानंतर काँग्रेसमधील काही नेतेमंडळी भाजपमध्ये आले. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपसोबत आल्याचा फायदा प्रताप पाटील-चिखलीकर यांना झाला आहे. 'पोल ऑफ पोल'ने वर्तवलेल्या अंदाजानुसार चिखलीकर यांना आघाडी मिळण्याची शक्यता वर्तवली आहे.

नांदेड लोकसभा निवडणुकीत भाजप व काँग्रेसची प्रतिष्ठा पणाली लागली होती. ऐन निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी भाजपसोबत घरोबा केला. त्याचा फायदा कोणाला होणार याची चर्चा जोर धरली होती. यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.

Ashok chavan, Pratap Chikhlikar
Thane Lok Sabha Exit Poll : नरेश म्हस्के ठाण्यातच घालवणार एकनाथ शिंदेंचं नाव?

नांदेडमध्ये भाजपचे प्रताप पाटील-चिखलकर व काँग्रेसचे वसंत चव्हाण यांच्यात अटातटीची लढत झाली. यामध्ये शेवटच्या टप्प्यात काँग्रेसने प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचे चित्र जाणवत होते. मात्र, त्याचा फायदा काँग्रेसचे (Congress) चव्हाण यांना झालेला नाही. अशोक चव्हाण यांच्या प्रवेशाचा फायदा प्रताप पाटील चिखलीकर यांना झाला. त्यामुळे ते आघाडीवर दिसत आहेत.

चुरशीच्या या निवडणुकीत विशेषतः दोन्ही बाजूने विकासात्मक मुद्दे न मांडता एकमेकांवर टीका करण्यातच धन्यता मानल्याने यावेळेस प्रचारात विकासात्मक मुद्दे गायब झालेले दिसले. त्यानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा चिखलीकर यांना अडचणीत आणेल, असे वाटत होते. मात्र, सर्वच अडचणीच्या मुद्द्यावर मात करीत भाजपचे चिखलीकर या ठिकाणी आघाडी घेताना दिसत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नांदेडमध्ये निवडणुकीची सूत्रे हातात घेत काँग्रेसचे स्टार प्रचारक अमित देशमुख यांनी घेतली होती. त्यांनी वसंत चव्हाणाच्या (Vasnat Chavan) प्रचारात त्यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला होता. त्यामुळे काँग्रेसला मदत होईल, असे वातावरण होते. मात्र, हे वातावरण मतदानात रूपांतर करण्यात काँग्रेसला अपयश आले.

Ashok chavan, Pratap Chikhlikar
Nanded Lok Sabha Constituency : नांदेडमध्ये वडील, मुलगा अन् जावई; 30-35 वर्ष एकाच कुटुंबाची सत्ता..

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com