Devendra Fadnavis : आमदारांशी चर्चा, सर्वांचे 'शक्तीपीठ'ला समर्थन; विरोध करणारे किती? CM फडणवीसांनी सांगून टाकलं

BJP CM Devendra Fadnavis Shaktipeeth Highway Nanded : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नांदेड दौऱ्यावर असताना त्यांनी शक्तीपीठ महामार्गावर प्रतिक्रिया दिली.
 Shaktipeeth Highway
Shaktipeeth HighwaySarkarnama
Published on
Updated on

Shaktipeeth Highway News : बहुचर्चित असलेला शक्तीपीठाला विरोध होत असतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोध करणारे किती आहेत, यावर भाष्य केले.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या विधानामुळे शक्तीपीठ मार्गाचा तिढा लवकरच सुटून काम लवकर सुरू होईल, असे संकेत मिळाले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस नांदेड दौऱ्यावर असतानाच, शक्तीपीठ मार्गावर प्रतिक्रिया दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, सर्व अमदारांसोबत चर्चा केली आहे. भेटलो आहे. त्यांनी शक्तीपीठ महामार्गाला समर्थन दिले आहबे. कोणाचाही विरोध नाही. विरोध मूठभर लोकांचा आहे. कृती समितीला घेऊन देखील आमदार माझ्याकडे येणार आहे. त्यावेळी त्यांचीशी चर्चा करू".

 Shaktipeeth Highway
Shivsena : 'मातोश्री'वर लिंबू अन् काळी जादू; फडणवीस 'वर्षा'वर का राहत नाहीत? राऊतांचा राणेंना सवाल

सतेज पाटीलांनी वेधलं लक्ष

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नांदेड दौऱ्यापूर्वी काँग्रेस (Congress) नेते सतेज पाटील यांनी समाज माध्यमांवर व्हिडिओ व्हायरल करत शक्तीपीठाला कसा विरोध होत आहे, याची माहिती दिली होती. कोल्हापूर, सांगलीनंतर आता नांदेडमध्ये शक्तीपीठ महामार्गाला जोरदार विरोध होत असून, सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी हा व्हिडिओ करत असल्याचे काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी म्हटले होते.

 Shaktipeeth Highway
TOP Ten News : एकनाथ शिंदेंचा फोन टॅपिंग? शस्त्र परवाना रद्दचा आकडा 183 वर पोचला, वाचा महत्त्वाच्या घडामोडी...

निवडणुकीपूर्वी शक्तीपीठ रद्दची घोषणा

निवडणुकीपूर्वी शक्तीपीठ महामार्ग रद्द केल्याची घोषणा करणारे महायुतीचे सरकार आपल्या ताकदीवर हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या माथी मारण्याच्या प्रयत्नात आहे. पण नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांनी आवाज उठवला असून सरकारला आपला हिसका दाखवला आहे, असे सतेज पाटील यांनी म्हटले.

शक्तीपीठ नाव का?

समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2023 मध्ये शक्तीपीठ महामार्गची घोषणा केली होती. हा शक्तीपीठ महामार्ग 802 किलोमीटर लांबीचा ग्रीनफिल्ड असून, नागपूर ते गोव्याला थेट जोडला जाणार होता. राज्यातील तीन शक्तीपीठांना हा महामार्ग जोडणार असल्याने या महामार्गाला ‘शक्तीपीठ’ महामार्ग, असे नाव देण्यात आलं होतं.

12 जिल्ह्यांमधून जाणारा शक्तीपीठ

वर्धा जिल्ह्यातून यवतमाळ, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरसह 12 जिल्ह्यांमधून जाणार आहे. नियोजित होता. शक्तीपीठ महामार्ग उभारणीसाठी राज्य सरकार 86 हजार कोटी रुपये खर्च करणार होतं. 2030 मध्ये हा महामार्ग सर्वसामान्यांसाठी खुला करण्याचा विचार होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com