Dr. Bhagwat Karad : डॉ. भागवत कराडांना झाली मराठवाडा वैधानिक मंडळाची आठवण !

Marathwada Statutory Development Board : मराठवाडा सामाजिक शैक्षणिक व आर्थिक दृष्ट्या मागासलेला असल्यामुळे या मराठवाडा विकास मंडळाचे पुनर्गठण करून न्याय द्यावा, अशी अपेक्षाही कराड यांनी राज्यपालांना दिलेल्या निवेदनात व्यक्त केली आहे.
Dr. Bhagwat Karad
Dr. Bhagwat KaradSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाडा व विदर्भ या मागासलेल्या आणि विकासापासून वर्षानुवर्ष वंचित राहिलेल्या भागांसाठी वैधानिक विकास मंडळ स्थापन करण्यात आले होते. मात्र 2014 नंतर या महामंडळांना सरकारने वाऱ्यावर सोडल्या सारखी परिस्थिती आहे. 2014 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदावर डॉ.भागवत कराड यांची नेमणूक केली होती. मात्र त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर पुन्हा हे महामंडळ अडगळी पडल्याचे चित्र आहे.

राज्यसभेचे खासदार तथा माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) यांना पुन्हा एकदा मराठवाडा विकास मंडळाची आठवण झाली आहे. नुकतीच त्यांनी राज्यपाल रमेश बैस यांची राजभवनात भेट घेऊन मराठवाडा विकास मंडळ पुनर्गठीत करण्याची मागणी केली. यासंदर्भात कराड यांनी राज्यपालांना निवेदन दिले असून मराठवाड्याच्या सामाजिक,आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी विकास मंडळ सुरू करणे गरजेचे असल्याचे या निवेदनात नमूद केले आहे. या भागाच्या विकासासाठी आणि प्रादेशिक असमतोल कमी करण्यासाठी 1 मे 1994 मध्ये राष्ट्रपतींच्या आदेशाद्वारे वैधानिक मंडळे स्थापन केली आहेत.

Dr. Bhagwat Karad
Asaduddin Owaisi : इम्तियाज जलील बॅक टू विधानसभा, ओवेसींनी सांगितले तयारीला लागा...

मराठवाडा सामाजिक शैक्षणिक व आर्थिक दृष्ट्या मागासलेला असल्यामुळे या मराठवाडा विकास मंडळाचे पुनर्गठण करून न्याय द्यावा, अशी अपेक्षाही कराड यांनी राज्यपालांना दिलेल्या निवेदनात व्यक्त केली आहे. जून 2018 मध्ये भागवत कराड यांच्यावर मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती. मराठवाडा (Marathwada) विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी 1994 मध्ये राष्ट्रपतींच्या आदेशानुसार या भागांसाठी वैधानिक विकास महामंडळ स्थापन करण्यात आली होती. मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष होण्याचा पहिला मान कमल किशोर कदम यांना मिळाला होता.

Dr. Bhagwat Karad
IAS Pooja Khedkar : IAS पूजा खेडकरच्या आई-वडिलांचा पोलिसांकडून शोध सुरू, फोन बंद असल्याचे गाठला बंगला

त्यानंतर शिवसेना-भाजप युतीची 95 मध्ये सत्ता असताना शिवसेनेचे दिवाकर रावते यांनी या महामंडळाचे अध्यक्षपद भूषवले. त्यानंतर प्रताप बांगर आणि 1999 ते 2009 अशी दहा वर्ष मधुकरराव चव्हाण हे या मंडळाचे अध्यक्ष होते. त्यानंतर बराच काळ मराठवाडा विकास महामंडळाचा पदभार विभागीय आयुक्तांकडे होता. राज्यात 2014 मध्ये शिवसेना-भाजप युतीचे सरकार आल्यानंतर अंतर्गत राजकारणातून या पदावर नियुक्ती रखडली. अखेर जून 2018 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी भागवत कराड यांच्यावर अध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपवली होती.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com