Raosaheb Danve On Opposition Meeting : रावसाहेब दानवेंची विरोधकांच्या बैठकीवर मिश्किल टिप्पणी ; म्हणाले, '' मोदी हटावसाठी बैठक की...?''

Marathwada Political News : '' भारतात लोकशाही संपली म्हणून बाहेरील देशात राहुल गांधी ओरडत आहेत. पण..''
Raosaheb Danve
Raosaheb DanveSarkarnama
Published on: 
Updated on: 

Parbhani : पाटण्यात त्यादिवशी 15 पक्ष मोदी हटाव म्हणून एकत्र आले आणि त्यांनी राहुल गांधींच्या लग्नाचा विषय काढला. त्यामुळे ती बैठक मोदी हटावची होती की राहुल गांधींच्या सोयरीकीची हेच कळालं नाही. अशा शब्दांत रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी विरोधकांच्या बैठकीवर मिश्किल टिप्पणी केली.

परभणीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आज रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे बोलत होते. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपविरोधात रणनीती आखण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ही बैठक बोलावली होती. या बैठकीवर दानवेंनी विरोधकांना टोला लगावला आहे.

दानवे म्हणाले, विरोधकांच्या पाटण्यात 15 पक्ष मोदी हटाव म्हणून एकत्र आले आणि त्यांनी राहुल गांधींच्या लग्नाचा विषय काढला. त्यामुळे ती बैठक मोदी हटावची होती की राहुल गांधींच्या सोयरीकीची हेच कळालं नाही असा टोला त्यांनी लगावला. (Opposition Meeting)

Raosaheb Danve
Raosaheb Danve News : भाजप सर्वात शक्तीमान पक्ष, संधीचं सोनं करा...

याचवेळी त्यांनी बीआरएसवरही भाष्य केलं. सध्या केसीआर हे सध्या बीआरएस पक्षाकडून महाराष्ट्रात पक्षाचा विस्तार करण्याचा प्रयत्न सुरु आहेत. त्याच पार्श्वभूमीवर रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं की, 'एका एकरात तीळ लावायला किती मेहनत लागते हे केसीआर(KCR) ला माहित आहे का? असंही दानवे यावेळी म्हणाले.

'भारतात लोकशाही संपली म्हणून बाहेरील देशात राहुल गांधी ओरडत आहेत. पण ज्या दिवशी तुमच्या आजीने आणीबाणी लादली त्याच दिवशी लोकशाही संपली. तर राहुल गांधींनी त्यांच्या आजीने केलेल्या मुस्काटदाबीच्या घटना तपासाव्यात असा सल्ला देखील यावेळी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी राहुल गांधींना दिला आहे. राहुल गांधी यांच्या आजीनेच लोकशाहीतील काळाकुट्ट दिवस आणला असल्याचा घणाघातही दानवे यांनी यावेळी केला.

Raosaheb Danve
Sanjay Raut News : '' राऊतांनी किमान साताऱ्यात येताना तोंडाला लगाम लावावा; नाहीतर...'' ; शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाचा गर्भित इशारा

मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांतील प्रमुख व्यवसाय हा शेती असल्याने शेतकऱ्यांचा शेतीमाल इतर राज्यातील बाजारपेठेत नेण्यासाठी मराठवाड्यातून किसान रेल सुरू केली जाईल. याचा फायदा परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होईल, असे आश्वासन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिले. भाजप(BJP) देशातील सर्वात शक्तीमान पक्ष आहे, या संधीचं सोनं येणाऱ्या काळात करून घ्या, असे आवाहन देखील दानवे यांनी केले.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.