Pankaja Munde News : भाजप नेत्या पंकजा मुंडेंची खदखद पुन्हा बाहेर; म्हणाल्या, '' एवढ्या वेळा नाकारले तरी...''

Shiv Shakti Parikrama Yatra : '' दुसऱ्यांच्या जबाबदारीत फार नाक खुपसत नाही...''
Pankaja Munde
Pankaja MundeSarkarnama

Beed : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आपल्या मनातील खदखद पुन्हा बोलून दाखविली. सध्या प्रत्येकाच्या मनात गढूळ वातावरण असून त्यात आपल्याला तुरटीचे काम करायची इच्छा आहे. यालाही हाणून पाडण्याचा डाव असू शकतो, यात्रेवर असुया असणाऱ्यांकडून चुकीचे काम होऊ शकते. मात्र, कार्यकर्त्यांनी डोक्यावर बर्फ ठेवून शांत रहायचे आहे. एवढ्या वेळा नाकारले, अडचण आली तरी मी तोल जाऊ दिला नाही, कार्यकर्त्यांनीही तोल जाऊ देऊ नये असे आवाहन मुंडे यांनी केले.

भाजप नेत्या पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांनी चार सप्टेंबरपासून सुरु केलेली शिवशक्ती परिक्रमा शनिवारी जिल्ह्यात पोहोचली. रात्री शहरात पोहोचलेल्या पंकजा मुंडे व खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांचे भाजपतर्फे स्वागत करण्यात आले. यावेळी पंकजा मुंडे बोलत होत्या.

Pankaja Munde
Chitra Wagh News : मोदींच्या नेतृत्वावर जगाने शिक्कामोर्तब केल्याने ठाकरेंचा जळगावात जळफळाट ; वाघ चवताळल्या

त्या म्हणाल्या, ज्योतिर्लिंग व शक्तिपीठांचे दर्शन घेण्यासाठी सुरु केलल्या शिवशक्ती परिक्रमेला(Shiv Shakti Parikrama Yatra) महाराष्ट्रात प्रचंड प्रतिसाद मिळाला. अनेक वर्षे आतुरलेले कार्यकर्ते अक्षरश: तुटून पडले. २०१९ पासून या, फिरा असे फोन येत आहेत. मात्र, जेव्हा जबाबदारी येईल तेव्हा ठीक आहे. पण, आपल्याला मध्य प्रदेशची जबाबदारी असून ती आपण पार पाडत आहोत, जिल्ह्याच्या जबाबदारीत लक्ष घालते असेही मुंडे म्हणाल्या.

'' दुसऱ्यांच्या जबाबदारीत फार नाक खुपसत नाही...''

पंकजा मुंडे म्हणाल्या, दुसऱ्यांच्या जबाबदारीत फार नाक खुपसत नाही. या वातावरणात अंतर्मुख होऊन विचार केला पाहीजे, गोंधळातून बाजूला होऊन विचार केला पाहिजे, प्रवाह जोरात असताना थांबले पाहिजे असा विचार केला. राजकारणात मंचावर, पत्रकार परिषदेत मी थांबतेय हे सांगायला हिंमत लागते. इतिहासात असे कधीच घडले नसेल, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

Pankaja Munde
Sada Sarvankar News : शिंदे गटाच्या सदा सरवणकरांचा ठाकरे, राऊतांवर गंभीर आरोप; '' आम्हांला पेट्रोल टाकून मनोहर जोशींचं...''

प्रत्येक युगानंतर बदल घडत असतो, जीवनात मला काही नको, जनतेचे प्रेम माझ्यावर असून फक्त विश्वास ठेवा असे आवाहनही पंकजा मुंडे यांनी केले. दरम्यान, भाजप(BJP) जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या पुढाकाराने पंकजा मुंडे व डॉ. प्रितम मुंडे यांचे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात फुलांची उधळण करत, दुचाकी फेरी काढून व भव्य हार घालून स्वागत करण्यात आले.

यावेळी मिरा गांधले, संतोष हंगे, अशोक लोढा, ॲड. सर्जेराव तांदळे, शिवाजी मुंडे, देविदास नागरगोजे, विक्रांत हजारी, डॉ. लक्ष्मण जाधव, सलीम जहांगीर, जगदीश गूरखुदे, शांतीनाथ डोरले, अजय सवाई, सुनील मिसाळ, डॉ. अभय वणवे, भूषण पवार, दीपक थोरात, कपिल सौदा, अनिल चांदणे, किरण बांगर, प्रमोद रामदासी, राजू शहाणे, गणेश पुजारी, बालाजी पवार, संध्या राजपूत, डॉ.जयश्री मुंडे, शितल राजपूत, सरपंच गुंदेकर, अण्णासाहेब भोसले, मच्छिंद्र सानप, उमेश खेडकर, आदी उपस्थित होते.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com