Haribhau Bagde News : भाजपला धक्का फिक्स, शिंदेंचं ठरलं ; सावे, दानवे अन् बागडेंच्या मनधरणीला अपयश

Bjp Vs Shivsena Politics News : छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला धक्का बसला आहे. भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांच्यासह नगरसेवक शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याने भाजपचे धाबे दणाणले आहेत.
Sarkarnam
SarkarnamHaribhau Bagde, Raju Shinde
Published on
Updated on

Raju Shinde News : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे. त्या धक्क्यातून महायुती सावरायचा प्रयत्न करीत असताना गेल्या काही दिवसापासून धक्क्यावर धक्के बसत आहेत. त्यामुळे महायुतीमधील धाकधूक वाढली असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला मोठा धक्का बसणार आहे. भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांच्यासह काही नगरसेवक शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याने भाजपचे धाबे दणाणले आहेत.

छत्रपती संभाजीनगरमध्ये रविवारी होणाऱ्या शिवसंकल्प मेळाव्यात हे सर्व भाजपचे नेतेमंडळी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे समजते. त्यामुळ आता भाजप (Bjp) नेत्याकडून राजू शिंदे यांची मनधरणी केली जात आहे. राजू शिंदे यांची बातमी समजताच मंत्री अतुल सावे, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यानंतर आता भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांनी फोन करून मनधरणी केली. (Haribhau Bagde News)

हरिभाऊ बागडे (Haribhau Bagde) यांनी राजू शिंदे यांना फोन केला. यावेळी बागडे यांनी राजू शिंदे यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. “मी उद्या येतो. आपण जरा भेटू. मला काही गोष्टी कानावर आल्या आहेत. मी आल्यावर त्यावर बोलतो”, असे आदेश शिंदेंना फोनवरुन दिले.

त्या नंतर फोनवर बोलताना राजू शिंदे यांनी म्हणाले “भाऊ आता निर्णय झालाय आणि त्या गोष्टीला उशीरही झाला आहे. आता माझ्या सहनशक्तीचा अंत झाला आहे. भाऊ आम्ही सर्वांनी मिळून निर्णय घेतला आहे. मी जरी थांबलो तरी बाकीचे थांबणार नाहीत. इतक्या दिवसांपासून हे सर्व सुरु आहे. त्यावर हरिभाऊ बागडे यांनी मी येत आहे. आपण आल्यानंतर बोलू, असे सांगितले.

Sarkarnam
Rahul Gandhi : राहुल गांधी पालखी सोहळ्यात कधी सहभागी होणार?; धैर्यशील मोहिते पाटलांनी सांगितल्या संभाव्य तारखा...

या सर्व फोनबाबत प्रतिक्रिया देताना राजू शिंदे म्हणाले, मी येत्या काळात शिवसेना उद्धव ठाकरे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये आता बदल होणे शक्य नाही. मला सकाळपासून हरिभाऊ बागडे, अतुल सावे, रावसाहेब दानवे यांचाही फोन आला. आता या गोष्टीला उशीर झाला आहे. शिवसेनेत प्रवेश करण्याची ही माझी एकट्याचीच नव्हे तर सर्वच कार्यकर्त्यांची भावना आहे.

राजू शिंदेंसह आठ माजी नगरसेवक करणार ठाकरे गटात प्रवेश

येत्या काळात माजी उपमहापौर राजू शिंदे (Raju Shinde) यांच्यासह सात ते आठ नगरसेवक शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. मी महापौर, शहराध्यक्ष होऊ शकलो असतो पण झालो नाही याचा विचार भाजपने करावा. रविवारी शिवसंकल्प मेळाव्यात आमचा सर्वांचा प्रवेश होणार आहे, इतर नगरसेवकांची नावे आम्ही आत्ताच सांगणार नसून त्यांच्यावर दबाव येईल’, असेही राजू शिंदे म्हणाले.

Sarkarnam
Smita Wagh, Raksha Khadse : कोटीच्या कोटी उड्डाणे! स्मिता वाघ यांचा सर्वाधिक; तर रक्षा खडसेंचा खर्च किती?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com