Rahul Gandhi-Dhairyasheel Mohite Patil
Rahul Gandhi-Dhairyasheel Mohite PatilSarkarnama

Rahul Gandhi : राहुल गांधी पालखी सोहळ्यात कधी सहभागी होणार?; धैर्यशील मोहिते पाटलांनी सांगितल्या संभाव्य तारखा...

Pandharpur Wari : राहुल गांधी पालखी सोहळ्यात कधी सहभागी होणार, याची तारीख अजूनही निश्चित झालेली नाही
Published on

Solapur, 05 July : लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस नेते राहुल गांधी हे आषाढी वारीच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणार आहेत. मात्र, त्यांच्या सहभागाची तारीख अजून निश्चित झाली नाही. पण राहुल गांधी हे अकलूज किंवा वाखरी येथे पालखी सोहळ्यात सहभागी होतील, असे माढ्याचे खासदार आणि निमंत्रक धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितले.

खासदार धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) म्हणाले, ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे, भिवंडीचे खासदार बाळ्यामामा म्हेत्रे, खासदार संजय दिना पाटील आणि मी एकत्र मिळून जाऊन लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना आषाढी वारीत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले आहे.

शरद पवार यांनी वारीचे महत्व आणि वारीची परंपरा याबाबत राहुल गांधी यांना समजावून सांगितली. राहुल गांधी यांनी आषाढी पालखी सोहळ्यात सहभागी होण्याचे नियोजन असल्याचे स्पष्टपणे सांगितले. पण, ते पालखी सोहळ्यात कधी सहभागी होणार, याची तारीख अजूनही निश्चित झालेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, अकलूजचे जे रिंगण आहे, ते बारा तारखेला होणार आहे. पण, राहुल गांधी यांची तारीख ही १३ की १४ मिळते की बारा मिळते, याबाबत अजूनही माहिती आम्हाला मिळालेली नाही. राहुल गांधी १२ तारखेला आले तर ते अकलूजमध्ये सहभागी होतील, नाही तर सदाशिवनगरमध्ये ते सहभागी होतील.

Rahul Gandhi-Dhairyasheel Mohite Patil
Gokul Scam : ...तर ‘गोकुळ’चे संचालक मंडळ बरखास्त झाले असते; अजूनही वेळ गेलेली नाही : शौमिका महाडिकांचा इशारा

राहुल गांधी यांची तारीख १४ च्या पुढे मिळाली तर ते थेट वाखरी येथेच पालखी सोहळ्यात सहभागी होतील. वाखरीच्या बंधू भेटीच्या सोहळ्यात ते दाखल होतील. त्यानंतर पुढे बाजीराव विहिरीपासून पुढे जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेतील, असं तात्पुरतं नियोजन आहे. मात्र, त्यांच्याकडून अजूनही कन्फर्मेशन आलेलं नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राहुल गांधी यांच्याकडून दौरा निश्चित झाल्याचे सांगितल्यानंतर मग आपल्याला त्यावर बोलता येईल. पण, सध्या तरी अजूनही त्यांच्या दौराबाबत कन्फर्मेशन आलेलं नाही, असेही मोहिते पाटील यांनी म्हटले आहे.

Rahul Gandhi-Dhairyasheel Mohite Patil
Assembly Session : विधानसभेतील किती आमदार पुढच्या काळात फ्लेमिंगो होतील?; शेलारांच्या प्रश्नावर सुधीरभाऊंचे हजरजबाबी उत्तर...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com