

प्रशांत बर्दापूरकर
Ambajogai News : बीड जिल्ह्यात नुकत्याच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पार पडल्या. यात भाजपला केवळ तीन बाजार समित्यांवर विजय मिळविता आला. यामध्ये कडा व पाटोदा बाजार समिती भाजपचे आमदार सुरेश धस यांनी जिंकली. तर, केज बाजार समिती निवडणुकीत भाजपचे जेष्ठ नेते रमेशराव आडसकर यांनी आमदार नमिता मुंदडा यांना सोबत घेत पुन्हा एकदा ताब्यात ठेवली. यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्था, पणन संस्थांप्रमाणेच आडसकर यांनी सहकारातले वर्चस्व कायम असल्याचे सिद्ध केले.
आता नुकत्याच प्रमुख चार सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका लागल्या होत्या. यात यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके(Prakash Solanke) यांच्या नेतृत्वाखाली लोकनेते सुंदरराव सोळंके कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणुक बिनविरोध करण्यात त्यांना यश आले. तर, माजी आमदार अमरसिंह पंडित यांनीही जयभवानी सहकारी साखर कारखान्याची निवडणुक बिनविरोध करण्यात यश मिळविले.
त्यानंतर परळीच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी आमदार धनंजय मुंडे यांना सोबत घ्यावे लागले.
याचदरम्यान, भाजपचे जेष्ठ नेते रमेशराव आडसकर(Rameshrao Aadaskar) यांनी स्थानिक स्वराज्य संस्था, पणन संस्थांप्रमाणेच सहकारातले आपले वर्चस्वही कायम असल्याचं सिद्ध केलं आहे. परिसरातील अंबा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणुक बिनविरोध झाली. दरम्यान, जिल्ह्यात सहकार, पणन व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वर्चस्व असलेल्या मोजक्या भाजप(BJP) नेत्यांमध्ये रमेशराव आडसकर आहेत.
दरम्यान, अंबा साखर कारखान्या(Amba Sugar Factory Election )च्या इतिहासात दिवंगत डी. एन. पाटील व दिवंगत लोकनेते माजी आमदार बाबूराव आडसकर हे कायम परस्पर विरोधक राहिले. त्यांच्यानंतर त्यांचे वारसदार दत्तात्रय पाटील व रमेशराव आडसकर हेही पुढे विरोधक राहिले. मात्र या निवडणुकीत हे दोघे एकत्र आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली.
आडसकर गटाचे १४ व पाटील गटाचे सा अशा जागांवर दोन्हीगटात तडजोड झाल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. नव्या संचालक मंडळात मावळते अध्यक्ष रमेशराव आडसकर, ऋषीकेष आडसकर यांच्यासह लक्ष्मीकांत लाड, राजाभाऊ औताडे, दत्तात्रय पाटील, विजय शिनगारे, बाळासाहेब सोळंके, मधुकर शेरेकर, अनिल किर्दंत, सभांजी इंगळे, जिवन कदम, ॲड. लालासाहेब जगताप, आनिल कातळे, विठ्ठलराव देशमूख, प्रमोद जाधव, गोविंद देशमुख, अशोक गायकवाड, पठाण मिनाज, रमाकांत पिगंळे, भागिरथीबाई साखरे, वत्सलाबाई शिंदे यांचा संचालक मंडळात समावेश आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.