भाजपच्या बोर्डीकरांकडून भांबळे गटाचा धुव्वा; निर्विवाद वर्चस्व राखत उधळला गुलाल

औद्योगिक वसाहत सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत बोर्डीकर गटाने सर्व १२ जागा जिंकल्या आहेत.
Vijay Bhamble, Ramprasda Bordikar
Vijay Bhamble, Ramprasda BordikarSarkarnama
Published on
Updated on

परभणी : औद्योगिक वसाहत सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीत भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर (Ramprasad Bordikar) यांच्या गटाने सर्व १२ जागा जिंकल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे (Ncp) माजी आमदार विजय भांबळे (Vijay Bhamble) यांच्या गटाचा निवडणुकीत धुव्वा उडाला आहे. दरम्यान, मतदानादरम्यान दोन्ही गटांच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला होता.

बोर्डीकर यांनी संस्थेवर निर्विवाद वर्चस्व राखले आहे. संस्थेच्या एकूण १३ जागांपैकी एक जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. परंतु या जागेसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्याने ती जागा रिक्त राहिली. उर्वरित १२ जागांपैकी सोसायटी मतदारसंघातून मीनाताई रामप्रसाद कदम-बोर्डीकर ह्या बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे रविवारी उर्वरित अकरा जागांसाठी मतदान झाले.

Vijay Bhamble, Ramprasda Bordikar
Maratha Reservation :संभाजीराजे यांना सरकारकडून चर्चेसाठी निमंत्रण

बोर्डीकर व भांबळे या दोन्ही माजी आमदारांच्या गटात रंगतदार लढत झाली. रविवारी दुपारपर्यंत मतदान प्रक्रिया पाडली. त्यानंतर लगेचच मतमोजणी होऊन सायंकाळी निकाल जाहीर करण्यात आला. त्यात सर्वच्या सर्व आकरा जागांवर बोर्डीकर गटाचे उमेदवार विजयी झाले. भांबळे गटाचा एकही उमेदवार विजयी न झाल्याने मोठी नामुष्की ओढवली.

दरम्यान, मतदानादरम्यान जिंतूर येथील एका मतदान केंद्रावर बोर्डीकर आणि भांबळे यांच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला. किरकोळ कारणावरून दोघांचे समर्थक एकमेकांना भिडल्याने जिंतूरमध्ये तणावाचे वातावरण होते. दोन्ही पक्षाच्या समर्थकांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमारही करावा लागला. जिंतूर शहरातील जिल्हा परिषद प्रशालेच्या मतदान केंद्रावर दोघेही नेते उपस्थित होते.

Vijay Bhamble, Ramprasda Bordikar
रशिया-युक्रेन युद्धावर आठवलेंनी केली कविता

यावेळी दोन्ही गट मतदान केंद्राच्या बाहेर तळ ठोकून असतांना मतदान केंद्राच्या शंभर मीटरच्या आत का आलात? म्हणून बोर्डीकर गटाच्या एकावर भांबळे यांनी आक्षेप घेतला. त्यावेळी बोर्डीकर व भांबळे यांच्यात वादविवाद सुरू झाला. वाद अधिकच वाढत गेला आणि दोन्ही नेत्यांचे समर्थक एकमेकांच्या दिशेने धावून गेले. हा जमाव अचानक आक्रमक झाला आणि दोन्ही बाजूंनी तुफान दगडफेक सुरू झाली. या प्रकाराने मतदान केंद्राच्या परिसरात पळापळ सुरू होऊन दहशत निर्माण झाली. घटनेची माहिती कळता पोलिसांची अधिक कुमक या ठिकाणी पाठविण्यात आली. पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना घटनास्थळावरून निघून जाण्याचे आवाहन केले. परंतू वाद अधिकच वाढल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com