Devendra Fadnavis: फडणवीसांचा मोठा निर्णय! महसूलमधील 22 अधिकाऱ्यांना दिवाळी भेट; 23 अतिरिक्त जिल्हाधिकारी IAS होणार

CM Devendra Fadnavis Approves Promotion of 22 Revenue Officers: अनेक वर्षांपासून महसूल विभागात पदोन्नती होत नसल्यामुळे उपजिल्हाधिकारी वर्गात शिथिलता आली होती या आदेशाने अधिकारी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
CM Devendra Fadnavis
CM Devendra Fadnavissarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: राज्यातील 22 उपजिल्हाधिकाऱ्यांना अप्पर जिल्हाधिकारी या पदावर बढती देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना दिवाळीचे मोठे गिफ्ट दिले आहे. त्यांच्या नियुक्तींचे शासन आदेश नुकतेच काढण्यात आले आहेत. पदोन्नती झालेल्या अधिकाऱ्यांचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी अभिनंदन केले आहे.

महसूल विभागातील 23 अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना निवड श्रेणीमध्ये (Selection Grade) पदोन्नती देण्यात आली आहे या बढतीमुळे या 23 अधिकारी हे भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) जाणार आहेत.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतची घोषणा केली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक पदे रिक्त होती. या निर्णयामुळे आता विदर्भ व मराठवाड्यातील अधिकाऱ्यांची अनेक रिक्त पदे भरण्यात आली आहेत. महसूलमंत्री बावनकुळेंचा हा मोठा निर्णय मानला जात आहे.

महसूलमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी विभागात पदोन्नती, आणि प्रलंबित कामांबाबत अनेक निर्णय घेतले आहे. अनेक वर्षांपासून महसूल विभागात पदोन्नती होत नसल्यामुळे उपजिल्हाधिकारी वर्गात शिथिलता आली होती या आदेशाने अधिकारी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. यापूर्वी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची सेवा ज्येष्ठता यादी तयार करण्यात आली होती. बावनकुळे यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे निवड श्रेणी पदी नियुक्तीचे आदेश दिले आहेत.

CM Devendra Fadnavis
Sharad Pawar NCP: तब्येतीच्या कारणाहून राजीनामा घेतलेल्या रेखा खेडकर म्हणतात 'मी ठणठणीत...'; राजीनाम्यामागे कोण?
  • महसूल विभागात गेल्या 15 ते 19 वर्षापासून उपजिल्हाधिकारी पदांवरील अधिकाऱ्यांना बढती देण्यात आली नव्हती.

  • एकाच पदावर अनेक वर्षे काम केल्याने येणारा तोच तोपणा आला होता. या निर्णयामुळे महसूल विभागात नवचैतन्य निर्माण झाले आहे.

  • यापूर्वी दुर्गम भागात अनेक वर्ष राहिलेल्या अधिकाऱ्यांना मुंबई, पुणे या शहरातही बढती व बदली यापूर्वी करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com