Rajesh Pawar : आमदार राजेश पवारांनी दिली भ्रष्ट अधिकाऱ्यांना शपथ; घरकुल लाभार्थ्यांकडून पैसे घेतल्याची दिली होती कबुली!

Naigaon Panchayat Samiti Oath For No Courrpation : घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांनी अधिकाऱ्यांकडून पैसे मागितले जातात अशा तक्रारीबद्दल राजेश पवार यांनी जाब विचारत अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.
BJP MLA Rajesh Pawar Action On Corruption News
BJP MLA Rajesh Pawar Action On Corruption NewsSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. घरकुल योजनेतील लाभार्थ्यांकडून लाच घेतल्याची कबुली समोर आल्यानंतर भाजप आमदार राजेश पवार यांनी संताप व्यक्त केला.

  2. पवार यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांना थेट शपथ दिली की, “गरीबांच्या हक्कांवर डाका टाकणार नाही.”

  3. या घटनेमुळे स्थानिक प्रशासनावर दबाव वाढला असून राज्यभरात या प्रकरणाची चर्चा रंगली आहे.

Nanded BJP News : भाजपाचे आमदार राजेश पवार यांच्यासमोरच अधिकारी आणि साईट इंजिनिअरने घरकुलच्या लाभार्थ्यांकडून पैसे घेतल्याची कबुली दिली. त्यानंतर पवारांनी संबंधित अधिकारी, इंजिनिअरला भ्रष्टाचार न करण्याची शपथ दिली. नायगाव पंचायत समितीवर प्रशासक राज असताना हा गैरप्रकार समोर आला. सरकार गरीबांना हक्काचे घर मिळावं म्हणून कोट्यावधीचा निधी देते आणि तुमच्यासारखे भ्रष्ट अधिकारी लाभार्थ्यांकडून पैसे उकळता का? अशा शब्दात राजेश पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.

नायगाव पंचायत समितीतील काही अधिकारी आणि साईट इंजिनिअर हे घरकुल लाभार्थ्यांकडून पैसे घखेत असल्याची माहिती आमदार राजेश पवार यांना मिळाली होती. यावरून काल त्यांनी नायगाव पंचायत समिती कार्यालयाला भेट दिली. या अचानक भेटीत त्यांनी अधिकाऱ्यांची पोलखोल केली. कामावर उशीरा येणे, न सांगता गैरहजर राहणे, असे प्रकार यावेळी निदर्शनास आले. अशा अधिका-यांच्या खुर्चीला हार घालून तसेच उशीरा आलेल्या अधिका-यांचा सत्कार करुन राजेश पवारांनी गांधीगिरी केली.

घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांनी अधिकाऱ्यांकडून पैसे मागितले जातात अशा तक्रारीबद्दल भाजप आमदार राजेश पवार यांनी जाब विचारत अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. त्यानंतर इंजिनिअर व ऑपरेटर यांनी घरकुल लाभ देण्यासाठी पैसे घेतल्याची कबुली दिली. या सर्व अधिका-यांना कारवाईचा इशारा देतानाच'भ्रष्टाचार न करण्याची'शपथ यावेळी देण्यात आली. नायगाव तालुक्यातील शेतकरी व सर्वसामान्यांना आपल्या घरकुलांचे हप्ते मंजूर करण्यासाठी लाच स्वरुपात मी एक रुपयादेखील मागणार नाही, अशी मी शपथ संबंधितानी घेतली.

BJP MLA Rajesh Pawar Action On Corruption News
MLA Rajesh Pawar News : आमदार राजेश पवार यांची सटकली; उपनिबंधकाला शिवीगाळ ऑडिओ व्हायरल, पण म्हणतात तो मी नव्हेच!

घरकुल लाभ देण्याचे काम करण्याची जबाबदारी माझी आहे. हे काम करण्यासाठी मला शासनाकडून पैसे/पगार मिळतो. शासनाकडून मिळालेल्या पैशांमध्ये माझे घर चालते, त्यामुळे गोरगरीबांकडून मी लाच घेतली नाही तरीदेखील माझ्या पोटापाण्याला काही फरक पडणार नाही. मला जर हे मान्य नसेल, तर मी या नोकरीचा राजीनामा देईल, असे या भ्रष्ट अधिकाऱ्यांकडून वदवून घेण्यात आले.

BJP MLA Rajesh Pawar Action On Corruption News
BJP Office: भाजपच्या नुतन प्रदेश मुख्यालयाच्या जागेवरुन वाद! BMCचा निवासी भूखंड 11 दिवसांत हस्तांतरीत; नेमकं प्रकरण काय?

नायगाव पंचायत समितीमध्ये होणारा भ्रष्टाचार ही अत्यंत गंभीर बाब असून येत्या हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा प्रकर्षाने मांडणार असल्याचे राजेश पवार यांनी यावेळी सांगितले. अचनाक झालेल्या या झाडाझडतीमुळे भ्रष्ट अधिका-यांचे धाबे दणाणले आहे. दरम्यान, आमदारांच्या भ्रष्टाचार विरोधातील शपथेची जिल्हाभरात चर्चा असली तरी निवडणुकीच्या तोंडावरच राजेश पवारांना ही बाब कळाली का? असा सवालही उपस्थितीत केला जात आहे.

FAQs

1. घरकुल योजनेत नेमकं काय घडलं?
→ लाभार्थ्यांकडून घरकुल मंजुरीसाठी लाच घेतल्याची कबुली काही अधिकाऱ्यांनी दिल्याचं उघड झालं.

2. राजेश पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली?
→ त्यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांना इशारा देत शपथ घेतली की, गरीबांच्या हक्कांवर अन्याय होऊ देणार नाही.

3. या प्रकरणात कोणत्या विभागातील अधिकारी आहेत?
→ स्थानिक पंचायत आणि नगरपरिषद विभागातील काही अधिकारी या प्रकरणात सहभागी असल्याचं सांगितलं जात आहे.

4. राज्य सरकारकडून कारवाई होणार का?
→ प्राथमिक तपास सुरू असून, राजकीय दबाव वाढल्याने कारवाईची शक्यता व्यक्त केली जाते.

5. लोकांची प्रतिक्रिया कशी आहे?
→ सर्वसामान्य नागरिकांनी राजेश पवारांच्या भूमिकेचं स्वागत करत भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com