Suresh Dhas On Prajakta Mali: धसांचं एक पाऊल मागं; प्राजक्ता माळीविषयी केलेल्या वक्तव्याप्रकरणी दिलगिरी; म्हणाले,'मी ग्रामीण भागातला...'

Suresh Dhas Vs Prajakta Mali Controversy : सुरेश धसांच्या वक्तव्यानंतर संतापलेल्या अभिनेत्री प्राजक्ता माळीनं वादळी पत्रकार परिषद घेतली होती. त्यात धस यांनी आपली माफी मागावी अन्यथा कडक कारवाईचा इशारा दिला होता. त्यानंतर तिने सीएम फडणवीसांची भेट घेतली होती. तसेच राज्य महिला आयोगात तक्रारही दाखल केली होती.
Prajakta Mali Suresh Dhas
Prajakta Mali Suresh Dhas sarkarnama
Published on
Updated on

Beed News : महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे आणि भाजप आमदार सुरेश धस यांच्यामध्ये संतोष देशमुख प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.पण परळी पॅटर्नचा उल्लेख करत सुरेश धस (Suresh Dhas) यांनी प्राजक्ता माळी यांचं नाव घेत खळबळजनक दावा केला होता. त्यामुळे गेल्या दोन तीन दिवसांपासून महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं होतं. भाजप नेत्यांनीच कान टोचल्यानंतर आता आमदार सुरेश धस यांनी एक पाऊल माघारीचं टाकत दिलगिरी व्यक्त केली आहे.

सुरेश धसांच्या वक्तव्यानंतर संतापलेल्या अभिनेत्री प्राजक्ता माळीनं (Prajakta Mali) वादळी पत्रकार परिषद घेतली होती. त्यात धस यांनी आपली माफी मागावी अन्यथा कडक कारवाईचा इशारा दिला होता. त्यानंतर तिने सीएम फडणवीसांची भेट घेतली होती. तसेच राज्य महिला आयोगात तक्रारही दाखल केली होती. याचवेळी महायुतीतील नेत्यांनीही धस यांची चांगलीच कानउघडणी केली होती. याच सगळ्या घडामोडींनंतर आता सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीविषयी केलेल्या वक्तव्याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आहे.

सुरेश धस म्हणाले, मी ग्रामीण भागातला आहे,त्यामुळे मी केलेल्या वक्तव्याचा प्रसारमाध्यमांनी विपर्यास केला आहे.माझ्या बोलण्याने कोणाची भावना दुखावली गेली असेल तर याबाबत मला चंद्रकांत पाटील यांचा फोन आला. त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. मी माफी-बिफी मागत नसतो असं म्हणणाऱ्या धस यांनी प्राजक्ता माळी यांचं जर मन दुखावलं असेल तर प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो, असा दोनच दिवसांत यू टर्न घेतल्याचं दिसून येत आहे.

ते म्हणाले, प्राजक्ताताई माळीबाबत माझ्या स्टेटमेंटचा गैरअर्थ काढण्यात आहे. मला त्यांचा अपमान करायचा नव्हता किंवा त्यांच्या चारित्र्याबाबतीत तर बोलण्याचा विषय नव्हता. मी प्राजक्ताताईसह सर्व स्त्रियांबाबत आदर बाळगतो. माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ निघाल्याने, त्यांचे किंवा अन्य कोणत्याही स्त्रीचे मन जर दुखावले असेल तर मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करत असल्याचं धस यांनी म्हटलं आहे.

Prajakta Mali Suresh Dhas
Devendra Fadnavis : बीडचा 'हा' बडा नेता सीएम फडणवीसांच्या भेटीला; राजकीय फासे पलटणार

दरम्यान, मला भाजपच्या कुठल्याही वरिष्ठ नेत्यांचा फोन आला नाही, किंवा कुणी माफीसाठी दबाव टाकला नाही. केवळ चंद्रकांत पाटील यांच्यासोबत माझं बोलणं झालं, असेही धस यांनी स्पष्ट केले. 

त्याचवेळी त्यांनी मला भाजपच्या कुठल्याही वरिष्ठ नेत्यांचा फोन आला नाही,किंवा कुणी माफीसाठी दबाव टाकला नाही. केवळ चंद्रकांत पाटील यांच्यासोबत माझं बोलणं झालं, असेही धस यांनी स्पष्ट केले.  त्यांनी चुकलो किंवा नाही चुकलो, तरीही तू क्षमा मागून टाक असं सांंगितलं. माझ्याकडून काहीही चुकलेलं नाही, तरीही एक मिनिटांत मी दिलगिरी व्यक्त करतो. असं धस यांनी म्हटलं.

प्राजक्ता माळी यांनी महिला आयोगाकडे केलेली तक्रार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट याबाबत भाजप आमदार सुरेश धस यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. धस म्हणाले, माझ्यासाठी तो विषय संपला आहे. त्यावर जर प्रश्न विचारणार असाल तर मी बोलणार नाही. जे काही झालं त्याला मी समोरे जायला तयार आहे. माझी बाजू अनेकांनी मंडली आहे. संतोष देशमुख यांची हत्या आणि बीड जिल्ह्याचं झालेले जंगल राज याचा फोकस डिव्हर्ट करू नका असं म्हणत याविषयांवर अधिकच बोलणं सुरेश धस यांनी टाळलं होतं.

Prajakta Mali Suresh Dhas
Suresh Dhas : बीडच्या पालकमंत्रीपदावरून सुरेश धस यांनी केली 'हे' मोठे विधान; म्हणाले,....

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने भेट घेतली. सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीचे नाव घेत 'परळी पॅटर्न' शब्दाचा वापर करून जे शब्द उच्चारले आहेत त्याला प्राजक्ताने आक्षेप घेतला आहे. तिने धस यांची महिला आयोगाकडे देखील तक्रार केली आहे. त्यामुळे प्राजक्ता माळी यांनी मुख्यमंत्र्यांच्या घेतलेल्या भेटीला वेगळे महत्त्व आले आहे. मात्र, या भेटीनंतरही आमदार सुरेश धस हे तलवार म्यान करायला तयार नाहीत.

शिवसेनेकडूनही कानपिचक्या...

आमदार सुरेश धस यांनी घेतलेल्या भूमिकेचं मी समर्थन आणि स्वागतच करत असल्याची भूमिका मांडली आहे. पण यामध्ये मराठी महिला कलाकार प्राजक्ता माळी यांचं नाव विनाकारण गोवण्यात येत आहे. कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय निराधार आरोप लावले जात आहेत.हे अत्यंत चुकीचं आहे.केवळ मराठी कलाकार आहेत म्हणून नव्हे तर कोणत्याही महिलेची अशा पद्धतीने मानहानी करणं चुकीचं आहे.हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. महिलांचा सन्मान हे आपलं कर्तव्य आहे, असंही खासदार म्हस्के यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com