Jarange On Munde-Dhas Meeting : मुंडेसोबतच्या भेटीनंतर मनोज जरांगे धसांवर तुटून पडले; म्हणाले, ‘गद्दारांच्या यादीत बसलात, मराठ्यांसोबत दगाफटका, आतून षडयंत्र...’

Santosh Deshmukh Murder Case : ज्या देशमुखांचे कुटुंबीय उघड्यावर पडले आहे, त्यांचं रक्त सुरेश धस यांनी प्यावं, शोषण करावं, असं आम्हाला कधीही वाटलं नव्हतं. माझा आताही सुरेश धस असं करतील, यावर विश्वास बसत नाही.
Dhananjay Munde- Suresh Dhas-Manoj Jarange Patil
Dhananjay Munde- Suresh Dhas-Manoj Jarange Patil Sarkarnama
Published on
Updated on

Beed, 14 February : आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीवर मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ‘मराठ्यांनी तुमच्यावर विश्वास टाकला. तुम्ही गद्दारांच्या यादीत जाऊन बसलात, हे दुःखदायक आहे. देशमुख कुटुंबीयांचे रक्त सुरेश धस शोषण करतील. मराठ्याच्या तोंडात माती टाकतील आणि त्यांच्या अन्नात घाण करील, असं आम्हाला कधीही वाटलं नव्हतं, अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी आमदार सुरेश धस यांच्यावर हल्लाबोल केला.

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) म्हणाले, तुमचे मतभेद आणि मनभेद नसतील, पण आमची माणसं मारून टाकायला लागले आहेत. तुमचे मनभेद आणि मतभेदांबाबत आम्हाला काहीही देणंघेणं नाही. तुम्ही हत्या करणारांपेक्षा क्रूरपणे वागणार असाल तर ते दुर्दैवी आहे. मराठ्यांनी तुमच्यावर विश्वास टाकला. तुम्ही गद्दारांच्या यादीत जाऊन बसलात, हे मात्र दुःखदायक आहे. तुम्ही कोणतं पाऊल उचलता, याचं तरी भान असायला पाहिजे. इतक्या लवकर तुम्ही सत्तेसाठी, पदासाठी मराठ्यांना सोडून त्यांच्यापुढं गुडघे टेकाल, असं कधीही आम्हाला वाटलं नव्हतं.

गोरगरिबांच्या लेकरांना जाळात फेकून राजकीय स्वार्थासाठी एकत्र जाण्याची त्यांना काय गरज होती. तुम्हाला समाजाने कुठं कमी केलं होतं. तुम्हीच सांगितलं होतं ना ते मला पडायला लागले आहेत. समाजाने तुम्हाला उचलून धरलं आणि निवडून आणलं. त्या समाजासोबत एवढा मोठा दगाफटका करताय आणि सांगताय की मतभेद आणि मनभेदाबाबत. त्यांची भेट झाली असेल तर...संतोष देशमुख (Santosh Deshmukh) आणि सूर्यवंशी यांचे आरोपी सोडून द्यायचं, असं त्यांचं आतून षडयंत्र ठरलेलं दिसतंय, असा आरोपही जरांगे पाटील यांनी केला.

Dhananjay Munde- Suresh Dhas-Manoj Jarange Patil
Suresh Dhas : धस धनंजय मुंडेंच्या भेटीला! नेमकं काय घडलं?, धसांनी क्लिअरच केलं

जरांगे पाटील म्हणाले, मुंडे-धस यांच्या भेटीमुळे पुरावे नष्ट केले जाऊ शकतात. चार्जशीट फोडलं जाऊ शकतं. सरकार मराठ्यांचं तिरस्कार करतंय, हे आता सिद्ध झालंय. मराठ्यांचे हे असले नासके नेते, ज्यांच्यावर लेकरांपेक्षा जास्त विश्वास या सुरेश धसांवर (Suresh Dhas) टाकला. त्यांनी आमचं काळीज कुऱ्हाडीनं तोडून न्यावं, अशी त्यांच्याकडून अपेक्षाच नव्हती. ज्या देशमुखांचे कुटुंबीय उघड्यावर पडले आहे, त्यांचं रक्त सुरेश धस यांनी प्यावं, शोषण करावं, असं आम्हाला कधीही वाटलं नव्हतं. माझा आताही सुरेश धस असं करतील, यावर विश्वास बसत नाही.

पंकजा मुंडेंना मंत्रिपदासाठी शुभेच्छा देणार का, असा सवाल विचारला तर ‘देणार नाही’, असं धस यांनी म्हटलं होतं. तुम्ही मुंडेविरोधातील लाटेत उडी मारली. मुंडेंच्या विरोधात बोललात; म्हणूनच मराठ्यांची पोरं तुमच्याकडून झाली. सुरेश धस हे मुंडेंचा इंगा जिरवणार, असं वाटायला लागलं होतं. पण, आता तेच मराठ्यांचे असूनही मराठ्यांचाच इंगा जिरवायला लागले आहेत, असेही जरांगे यांनी नमूद केले.

Dhananjay Munde- Suresh Dhas-Manoj Jarange Patil
Santosh Deshmukh Case : रमेश आडसकरांचा देशमुख कुटुंबीयांसाठी मोठा निर्णय; नियमांत बदल करत संतोष देशमुखांच्या पत्नीला दिली नोकरी

ते म्हणाले, माझा अजूनही त्या भेटीवर विश्वास बसत नाही. त्यांची बोलण्याची धग पाहून मुंडेंना जेलमध्ये घातल्याशिवाय ते स्वस्थ बसणार नाहीत, असंच वाटत होतं. मात्र, ते मराठ्याच्या तोंडात माती टाकतील, त्यांच्या अन्नात घाण करतील, असं कधीही वाटलं नव्हतं. त्यामुळे कधीही त्यांच्या पाठीमागे उभं न राहणारी पोरं त्यांच्या पाठीशी उभी राहिली होती. पण, सुरेश धस हे इतक्या लवकर धोका देतील, असं वाटलं नव्हतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com