Suresh Dhas CM meeting : अजितदादांची 'पकड' नाही? सुरेश धस यांना देखील भरोसा नाय; मुख्यमंत्र्यांबरोबर उद्या मुंबईत बैठक
Beed law and order issue : शिवराज दिवटे या युवकाला झालेल्या मारहाणीनंतर बीडमधील कायदा-सुव्यवस्थेवरून पुन्हा वातावरण तापलं आहे. मनोज जरांगे यांनी बीडच्या कायदा-सु्व्यवस्थेवरून पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.
बीडची गुन्हेगारी रोखण्यासाठी अजितदादांची पकड नसल्याची टीका जरांगेंनी केली. यापाठोपाठ भाजप आमदार सुरेश धस यांनी बीडच्या गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वेळ मागितला आहे. मुंबईत उद्या किंवा पुढील दोन दिवस बैठक घेऊन निर्णय घेणारच, असे सूचक संकेत आमदार धस यांनी दिले.
शिवराज दिवटे या युवकाला बेदम मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यांनतर, बीडमधील (BEED) कायदा-सु्व्यवस्थेवरून पुन्हा राजकीय संघर्ष पेटला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर असताना, तिथं जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली. दौऱ्यावर असताना, अजितदादांनी जखमी शिवराज याची भेट न घेल्याने मराठा कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मनोज जरांगे यांनी देखील बीडमधील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पकड नसल्याची टीका केली. आमदार धस यांनी आता यावरून आक्रमक भूमिका घेत, मुख्यमंत्र्यांकडे जाण्याची तयारी केली आहे.
आमदार सुरेश धस म्हणाले, "बीडमधील कायदा-सु्व्यवस्थेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याबरोबर मुंबईत बैठक होईल". शिवराज दिवटे याला भेटण्यासंदर्भात मी काही बोलणार नाही, ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, अजितदादांनी भेटावे की नाही हा त्यांचा प्रश्न आहे, असे आमदार धस यांनी म्हटले.
शिवराज दिवटे याला मारहाण करणारे गुन्हेगारी प्रवृत्तीची असून, कोणतीही माहिती न घेता शिवराज दिवटे याच्यावर हल्ला केला आहे. यात सात आरोपी अटक केले आहेत. पोलिसांना उर्वरित आरोपींचा शोध घ्यावा. दिवटे याला न्याय मिळाला पाहिजे. ही घटना साधी-सोपी नाही. यात मोठी गँग आहे, असा संशय देखील आमदार धस यांनी म्हटले.
मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीसाठी उद्या वेळ मागितली आहे. उद्या नाही मिळाली तर परवा बैठक करणारच. यात बीडमधील कायदा व सुव्यवस्थेबाबत चर्चा करणार आहे. देशमुख यांची हत्या होऊन देखील बीडमधील कायदा व सुव्यवस्था अबाधित नाही, याकडे लक्ष वेधणार आहे. काही निर्णय घ्यावेच लागतील, तशी मागणी देखील करणार असल्याचे आमदार धस यांनी म्हटले.
पोलिस अधीक्षक यांना कारवाईसंदर्भात पत्र दिले आहेत, जे पत्र दिले आहेत, त्यावर पोलिस अधीक्षक काय निर्णय घेतात, हे पाहावे लागेल. पोलिस दलातील काही अधिकारी पक्षाच्या नेत्यांसाठी राबतात. त्यांना बाहेर काढणं गरजेचं आहे, असेही सुरेश धस यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.