Sunil Tatkare mocks Bharat Gogawale : रायगडचं राजकारण 'नॅपकिन'वरून तापलं; तटकरेंच्या 'नक्कल'वर गोगावले बाप-लेकींनं सुनावलं...

NCP Sunil Tatkare Mocks Shiv Sena Minister Bharat Gogawale Napkin Style at DCM Ajit Pawar Mahad Rally : राष्ट्रवादीच्या खासदार सुनील तटकरे यांनी महाडच्या सभेत शिवसेना मंत्री भरत गोगावली यांची नक्कल केली आहे.
Sunil Tatkare mocks Bharat Gogawale
Sunil Tatkare mocks Bharat GogawaleSarkarnama
Published on
Updated on

Shivsena Vs NCP Raigad Mahad : रायगड जिल्ह्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत छत्तीसचा आकडा कायम आहे. पालकमंत्रीपदावरून शिवसेना मंत्री भरत गोगावले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री आदिती तटकरे यांच्या राजकीय संघर्ष उफाळला आहे.

भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील यावर तोडगा काढणं आता अवघड बनू लागलं आहे. गोगावले अन् तटकरे एकमेकांना शह देण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत. खासदार सुनील तटकरे यांनी महाड इथल्या सभेत 'नॅपकिन'ची नक्कल करत मंत्री गोगावलेंना डिवचलं आहे.

शिवसेना (Shivsena) उद्धव ठाकरे सेना पक्षाच्या महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यासाठी महाड इथं अजित पवार यांच्या उपस्थित झालेल्या सभेत, खासदार सुनील तटकरे यांनी 'नॅपकिन'ची नक्कल करत शिवसेना मंत्री भरत गोगावले यांना डिवचलं आहे.

खासदार तटकरे यांच्या नक्कलवरून रायगडमधील एनसीपी (NCP) अन् शिवसेनेमधील राजकीय वातावरण तापलं आहे. मंत्री गोगावले यांची लेक शीतल गोगावले यांनी खासदार तटकरे यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. मोबाईलवर व्हिडिओ 'स्टेटस' ठेवत, खासदार तटकरेंना सुनावलं आहे.

Sunil Tatkare mocks Bharat Gogawale
Beed political BJP And NCP : अजितदादांच्या बीड दौऱ्यात मोठी घडामोड; कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर उभे...

'उभ्या आयु्ष्यात 'नॅपकिन'ची जादू काय आहे कळणार नाही, असा टोला लगावत वडील भरत यांचा निडवणुकीतील विजयानंतर निघालेल्या मिरवणुकीत 'नॅपकिन' फिरवतानाचा व्हिडिओ स्टेटसला ठेवला आहे. तसंच 'टिश्यू पेपर वापरुन फेकण्याची सवय आम्हाला कधीच नाही, गोगावलेंच्या नॅपकिनमध्ये हजारो शेतकऱ्यांचे आशीर्वाद आहेत', अशी प्रतिक्रिया देत, 'नक्कल'वरून तटकरेंना शीतल यांनी सुनावलं आहे.

Sunil Tatkare mocks Bharat Gogawale
Municipal Officer Properties : महापालिका कर्मचाऱ्यांची मालमत्ता जाहीर करा; CM फडणवीस निर्णय घेणार का?

'नॅपकिन'मध्ये काय आहे?

मंत्री भरत गोगावले यांनी देखील यावर प्रतिक्रिया देत तटकरेंना सुनावलं आहे. भरतशेठच्या 'नॅपकिन'ची नक्कल सर्वांनाच करता येणार नाही. 'नॅपकिन' आम्ही वेटरसारखा खांद्यावर घेत नाही, 'नॅपकिन'मध्ये काय आहे, तर गोरगरीबांचे आशीर्वाद आहेत', असे गोगावले यांनी सुनावलं आहे.

तटकरेंच्या नकलाचा कार्यक्रम लावू

मी काल, परवापासून 'नॅपकिन' वापरत नाही, तर अनेक वर्ष वापरतोय आणि आता मला ती सवय झाली आहे. तुम्हाला सवय करायची असेल, तर आम्ही ट्रेनिंग देऊ, असा खोचक टोला देखील गोगावले यांनी तटकरेंना लगावला. आम्हाला वाटलं नव्हतं ते इतके नकलाकार असतील, पाऊस उघडल्यावर त्यांचा एखादा कर्यक्रम लावू, अशी खिल्ली देखील मंत्री गोगावले यांनी उडवली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com