Ashok Chavan : नांदेड जिल्ह्यातील दोन तालुके वगळल्याने अशोक चव्हाण नाराज, पाठपुरावा सुरू!

Marathwada Drought News : राज्य सरकारने ट्रिगर-१ लागू असलेल्या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. पण जाहीर केलेल्या यादीत नांदेड जिल्ह्यातील दोन तालुक्यांचा यात समावेश करण्यात आलेला नाही.
Nanded Drought; BJP MP Ashok Chavan
Nanded Drought; BJP MP Ashok Chavansarkarnama
Published on: 
Updated on: 

Nanded News : राज्य सरकारने खरीप २०२६ च्या हंगामात पावसाअभावी नुकसान झालेल्या जिल्ह्यांमध्ये ट्रिगर-१ लागू केले आहे. मराठवाड्यातील ७६ पैकी ७४ तालुक्यांचा या यादीतमध्ये समावेश आहे. परंतु नांदेड जिल्ह्यातील दोन तालुके या यादीतून वगळण्यात आले आहेत.

भाजपचे राज्यसभेतील खासदार अशोक चव्हाण यांचे वर्चस्व असलेल्या जिल्ह्यातील हे दोन तालुके असल्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. नांदेड जिल्ह्यातील इतर चौदा तालुक्यांप्रमाणेच मुखेड आणि मुदखेड या वगळण्यात आलेल्या दोन तालुक्यात देखील दुष्काळी परिस्थितीच असल्याचा दावा शेतकर्‍यांनी केला आहे.

आपले तालुके दुष्काळी परिस्थितीच्या यादीतून वगळल्याने या भागातील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. स्वतः अशोक चव्हाण हे देखील यामुळे नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर ट्रिगर-१ च्या यादीमध्ये मुखेड आणि मुदखेड या दोन तालुक्यांचाही समावेश व्हावा, यासाठी अशोक चव्हाण यांनी तातडीने प्रशासनातील संबंधित अधिकार्‍यांशी संपर्क साधून पाठपुरावा सुरू केला आहे.

Nanded Drought; BJP MP Ashok Chavan
Ashok Chavan News : खासदार संजय राऊत यांच्या टीकेला अशोक चव्हाण यांच्याकडून जशास तसे उत्तर; म्हणाले, 'त्यांची ही शेवटची तडफड'

सन २०२६ च्या खरीप हंगामात ट्रिगर-१ लागू झालेल्या राज्याच्या ३४ जिल्ह्यातील ३५५ तालुक्यांपैकी एकूण २६५ तालुक्यांमध्ये राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. शेतकर्‍यांच्या संकट काळात मदतीला धावून जाण्याचा शब्द राज्य सरकारने पाळला असून, या निर्णयामुळे २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी उपाय योजना व सवलती लागू केल्या जातील.

नांदेड जिल्ह्यामध्ये १६ पैकी १४ तालुक्यांमध्ये ट्रिगर-१ म्हणजेच पावसाची तूट आणि खंडाचा निकष लागू झाला आहे. मात्र मुदखेड आणि मुखेड या दोन तालुक्यात ट्रिगर-१ लागू झाला नाही. त्यामुळे दुष्काळी तालुक्यांच्या पहिल्या यादीत त्यांचा समावेश नाही. मुदखेड व मुखेड या दोन्ही तालुक्यात जिल्ह्यातील इतर तालुक्यांप्रमाणेच दुष्काळी परिस्थिती आहे.

Nanded Drought; BJP MP Ashok Chavan
Harshwardhan Sapkal Vs Ashok Chavan : ‘Face the Fact’वरून सपकाळांचा अशोक चव्हाणांवर पलटवार; ‘आधी स्वतःचा चेहरा आरशात पाहा’

त्यामुळे इतर निकषांच्या आधारे मुदखेड व मुखेड हे दोन तालुके दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या पुढील यादीत समाविष्ट करावेत, अशी आमची मागणी आहे. या संदर्भात माझे प्रशासनाशी बोलणे झाले असून, या दोन तालुक्यातील शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी आम्ही आग्रहपूर्वक पाठपुरावा करू, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com