Maharashtra Assembly Election 2024 : लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने धीरज देशमुख यांना दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर भाजप कोणाला उमेदवारी देणार? याची उत्सूकता सगळ्यांना होती. पण भाजपने तीन वेळा या मतदारसंघात पराभव झाल्यानंतरही बदल न करता जुनाच प्रयोग केला आहे. दोन वेळा लातूर ग्रामीणमधून पराभूत झालेल्या विधान परिषदेचे आमदार रमेशअप्पा कराड यांनाच तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे.
भाजपची दुसरी यादी आज जाहीर झाली, यात रमेश कराड यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे. या मतदारसंघात धीरज देशमुख आणि रमेश कराड यांच्यात दुसऱ्यांदा लढत होत आहे. (BJP) भाजपची पहिली यादी प्रसिद्ध झाल्यापासून लातूर ग्रामीण मध्ये काँग्रेसचे धीरज देशमुख यांच्या विरोधात कोण लढणार? याची उत्सुकता होती. मतदार संघ पुनर्रचनेनंतर स्थापन लातूर ग्रामीण मतदार संघावर सुरुवातीपासूनच काँग्रेसने आपले वर्चस्व राखले आहे.
2009 मध्ये काँग्रेसच्या वैजनाथ शिंदे यांनी भाजपच्या रमेश कराड यांचा पराभव केला होता. त्यानंतर 2014 मध्ये शिवसेना-भाजप आणि काँग्रेस राष्ट्रवादी हे स्वतंत्रपणे लढले. भाजपकडून रमेश कराड तर शिवसेनेकडून हरिभाऊ साबदे हे दोघे रिंगणात होते. या निवडणुकीत काँग्रेसच्या त्रिंबक भिसे यांनी विजय मिळवत जागा राखली.
2019 मध्ये काँग्रेसने नवा चेहरा देत विलासराव देशमुख यांचे चिरंजीव धीरज देशमुख यांना लातूर ग्रामीण मधून मैदानात उतरवले. (Latur) शिवसेना-भाजप युती असल्याने ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली. सचिन देशमुख यांनी साडेतेरा हजार मते मिळवत त्यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. तर दुसऱ्या क्रमांकावर तब्बल साडे सत्तावीस हजार मते ही `नोटा`ला मिळाली होती. या निवडणुकीत काँग्रेसला पूरक अशी भूमिका भाजपने घेतल्याचा आरोप करण्यात आला होता.
आता तिसऱ्यांदा भाजपने रमेश कराड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सहा महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीच्या शिवाजी काळगे यांनी भाजपच्या सुधाकर शृंगारे यांचा पराभव केला. विधानसभा निवडणुकीत या पराभवाची परतफेड लातूर जिल्ह्यातील अधिकाधिक जागा जिंकून करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. लातूर ग्रामीणमध्ये पक्षाकडून यावेळी नवा प्रयोग केला जाईल, अशी शक्यता वर्तवली जात होती.
विलासराव देशमुख मुख्यमंत्री असतांना त्याचे `ओएसडी` राहिलेले शंकरअप्पा भिसे यांनी मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्याने ते लातूर ग्रामीण मधून धीरज देशमुख यांच्या विरोधात मैदानात उतरतात का? अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र पक्षाने पुन्हा एकदा रमेश कराड यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी दिली आहे. आता सलग तीन निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर भाजप यावेळी तरी लातूर ग्रामीणमध्ये चमत्कार दाखवणार का ? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.