Latur Loksabha Constituency : देशमुख काका-पुतण्यांनी भाजपला लातूरमध्ये मोदींची सभा घ्यायला पाडलं भाग?

Mahavikas Aghadi News : महाविकास आघाडी लातूरची जागा पुन्हा काँग्रेसच्या ताब्यात घेऊन भाजपला झटका देऊ पाहत आहे.
PM Modi
PM ModiSarkarnama

Latur Political news : काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला लातूर आम्ही पुन्हा ताब्यात घेणारच. लातूर काँग्रेसचा बालेकिल्ला होता, आहे आणि राहणार, असा दावा करत देशमुख काका-पुतण्यांनी लोकसभेच्या लातूर मतदारसंघात भाजपला आव्हान दिले आहे. महाविकास आघाडीने डाॅ. शिवाजी काळगे यांची उमेदवारी जाहीर केल्यापासून आमदार अमित देशमुख, धिरज देशमुख यांनी त्यांच्या प्रचाराची सुत्र आपल्या हाती घेतली. तर काका माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले आहे.

वैशालीताई देशमुख यांनी प्रचारात उतरत महिलांना महाविकास आघाडीच्या बाजूने वळवण्याचे काम केले, तर सुरुवातीला पडद्यामागून सुत्र हलवणारे दिलीपराव देशमुख प्रचाराच्या अंतिम टप्प्यात समोर आले आहेत. भाजप(BJP) लातूरमध्ये हॅट्रीकच्या तयारीत आहे, पण काँग्रेस महाविकास आघाडी लातूरची जागा पुन्हा काँग्रेसच्या ताब्यात घेऊन भाजपला झटका देऊ पाहत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

PM Modi
Jalna Loksabha Constituency : दानवेंच्या प्रचारासाठी अब्दुल सत्तारांच्या पायाला भिंगरी!

प्रचारात महाविकास आघाडीने बाजी मारली असली तरी भाजपने आता खऱ्या अर्थाने निवडणुकीची सूत्र हाती घेतल्याचे चित्र आहे. राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांच्या चकरा लातूरात वाढल्या आहेत, तर सुधाकर श्रृंगारे यांच्यासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) मंगळवारी 30 एप्रिल रोजी लातूरमध्ये सभा घेणार आहेत. मराठवाड्यातील मोदींची ही तिसरी सभा असेल.

यापैकी नांदेड-लातूरात भाजपचे तर परभणीत महायुतीचे महादेव जानकर निवडणूक लढवत आहेत. लातूर मतदारसंघातून विद्यमान खासदार सुधाकर श्रृंगारे यांना दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर झाली, परंतु त्यांच्याबद्दल मतदारसंघात नाराजी असल्याचा अहवाल भाजपच्या वरिष्ठांकडे पाठवण्यात आला होता. निगेटिव्ह अहवाल असूनही श्रृंगारे यांनी उमेदवारी मिळवल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते.

महाविकास आघाडीच्या(Mahavikas Aghadi) काळगे यांच्या प्रचाराची एक फेरी पूर्ण झाल्यानंतर श्रृंगारे यांच्या प्रचाराला सुरवात झाली होती. आमदार संभाजी पाटील निलंगेकर वगळता जिल्ह्यातील भाजपचे इतर नेते प्रचारात फारसे दिसले नाही. नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यातली मरगळ झटकून टाकण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मेळावा घ्यावा लागला.

PM Modi
Parbhani Lok Sabha: मतदारांनो तुमची साथ वणव्यामध्ये गारव्यासारखी, संजय जाधव झाले भावूक

त्यानंतर काल भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी लातूरात येऊन भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांची शाळा घेतली. एकूणच लातूरात सुधाकर श्रृंगारे यांना दुसऱ्यांदा निवडून आणण्यासाठी भाजपला बरीच कसरत करावी लागणार, असे दिसते. त्यामुळेच पंतप्रधान मोदी यांच्या लातूरातील सभेचा घाट घालण्यात आल्याची चर्चा आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com