Jalna Loksabha Constituency : दानवेंच्या प्रचारासाठी अब्दुल सत्तारांच्या पायाला भिंगरी!

Abdul Sattar and Raosaheb Danve : 'विधानसभेवेळी मात्र माझा बिसमिल्ला होणार नाही, याची..', असंही सत्तारांनी दानेवेंना म्हटलेलं आहे.
Sattar and Danve
Sattar and DanveSarkarnama

loksabha Election 2024 : मराठवाड्याच्या राजकारणातले दोन बडे नेते आणि ऐकमेकांचे राजकीय विरोधक असले तरी पडद्यामागील मैत्रीमुळ संपुर्ण राज्याला ओळख असलेले केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि राज्याचे अल्पसंख्याक विकास व पणन मंत्री अब्दुल सत्तार सध्या सोबत फिरत आहेत. पुर्वी सत्तार काँग्रेसमध्ये तरीही त्यांची भाजपाचे नेते रावसाहेब दानवेशी मैत्री होतीच, आता तर राज्यात महायुती आहे.

अब्दुल सत्तार(Abdul Sattar) आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत असल्यामुळे आता त्यांना दानवेंना लपून छपून मदत करण्याची गरज राहिलेली नाही. उघडपणे ते आपल्या मित्राचा प्रचार करू शकतील. मध्यंतरी आजारपणामुळे लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेपासून अंतर राखून असलेले अब्दुल सत्तार सक्रीय झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर आणि त्याआधी जालना लोकसभा मतदारसंघातून रावसाहेब दानवे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सत्तार आवर्जून उपस्थितीत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sattar and Danve
Parbhani Lok Sabha Constituency : परभणीत जानकर-जाधवांमध्ये काँटे की टक्कर; शिट्टी तर वाजली, पण...

जालन्यातील प्रचार सभेत बोलतांना सत्तार यांनी आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये रावसाहेब दानवे(Raosaheb Danve) यांचे लोकसभेला काम करण्याच्या बदल्यात आपल्याला विधानसभेला मदत करण्याचा शब्द घेतला. माझा बिसमिल्ला होणार नाही, याची काळजी आणि जबाबदारी रावसाहेब दानवे तुम्हाला घ्यावी लागेल. तुम्ही मला मदत करालच याची खात्री आहे, कारण माझी सासुरवाडी भोकरदन आणि तुमची सासुरवाडी माझ्या सिल्लोड मतदारसंघात असल्याची आठवण सत्तार यांनी यावेळी करून दिली.

त्यानंतर संभाजीनगर येथे संदीपान भुमरे यांचा उमेदवारी अर्ज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थीतीत दाखल केल्यानंतरच्या सभेतील भाषणात सत्तार यांनी जालना लोकसभा मतदारसंघासह संभाजीनगर मधील काही विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी मी घेतल्याचे जाहीर केले होते.मात्र सत्तार यांनी प्रचारात आपले मित्र रावसाहेब दानवे यांना झुकते माप दिल्याचे दिसून आले आहे. रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी सत्तार यांनी जणू पायाला भिंगरी बांधल्याचे चित्र आहे.

Sattar and Danve
VBA News : डबलगेम ! अपक्ष, वंचितकडून असे दोन अर्ज भरले; कुठलाही राजकीय स्टंट नाही..

सिल्लोड-सोयगाव या आपल्या विधानसभा मतदारसंघातून रावसाहेब दानवे यांना सर्वाधिक मताधिक्य मिळवून देण्याचा दावा सत्तार यांनी केला आहे. दानवे यांच्याविरोधात निवडणूक लढवत असलेले महाविकास आघाडीचे उमेदवार डाॅ. कल्याण काळे(Kalyan Kale) हे देखील सत्तार यांचे मागील काळातील काँग्रेसचे सहकारी आहेत. परतु दानवे यांच्यासोबतच्या मैत्रीचे नाते अधिक घट्ट करत सत्तारांनी 'दोस्ती इम्तेहान लेती है'चा सूर लावला आहे. एकूणच सत्तार यांचा दानवेंच्या प्रचारातील उत्साह पाहता नेमकं उमेदवार कोण आहे? असा प्रश्न पडतो.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com